ब्रॅण्ड म्हणजे नक्की काय?

ब्रॅण्ड म्हणजे नक्की काय? 

अमूक एक ब्रॅण्ड खूप भारी आहे, तमूक एक ग्रॅण्ड खूप मोठी जाहिरात करतो, ग्रॅण्डींग करायला पाहिजे. शेवटी ब्रॅण्ड महत्त्वाचा… अशी अनेक वाक्ये आपण रोज बोलतो, ऐकतो. पण ब्रॅण्ड म्हणजे नक्की काय, याचा उलगडा प्रत्येकालाच झालेला असतो असे नाही. मी आज तुम्हाला अजून सोप्या भाषेत सांगू इच्छितो, की ग्रॅण्ड म्हणजे एक ‘प्रॉमिस’ असते. एक वचन असते. एकतर ते पूर्ण केले जाते, नाहीतर पूर्ण केले जात नाही. जे पूर्ण करतात त्यांची विश्वासार्हता वाढत जाते आणि ग्रॅण्ड निर्मितीच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो.
अजून एक गोष्ट, ब्रॅण्डींगच्या नावाखाली उठसूठ कुठेही जाहिरात करायची नाही. आपले ‘स्टॅण्डर्ड’ टिकवून ठेवणे हेही ब्रॅण्डींगचं काम असते. ग्राहकांना आपला ‘वीट’ येईल इतकाही जाहिरातींचा अतिरेक करू नये. एक महत्त्वाची (खूपच महत्त्वाची) गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तींसमोर आपली जाहिरात असणे म्हणजे खरे ब्रॅण्डींग !
व्यापारी, उद्योजक खूप कष्टाने, मेहनतीने, व्यवसाय करत असतात. आपले नाव मोठे करत असतात. आपली उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि आपली एक ‘इमेज’ क्रिएट करत असतात. अशावेळी चुकीच्या
पध्दतीचे ब्रॅण्डींग, चुकीच्या पध्दतीची जाहिरात त्यांच्या अस्तित्वाला, इमेजला धक्का पोहोचवू शकते. तेव्हा खूपच विचारपूर्वक ब्रॅण्डींग, अॅडव्हर्टायझिंग करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मदतीने हे शक्य होते. लक्षात ठेवा, अॅडव्हर्टायझिंग, ग्रॅण्डींगसाठी तुम्ही हजारो रूपये खर्च करता. पण त्यातून खरेच तुमचा सेल वाढतोय का, याचा वेळोवेळी आढावा घेत चला !
केवळ सुंदर दिसणे म्हणजे ग्रॅण्डींग नाही. ‘सेल’ वाढलाच पाहिजे. तुम्ही घेत असलेले कष्ट, तुमची उत्पादने, तुमचे ‘प्रॉमिस’ या सर्व गोष्टी योग्य पध्दतीनेच ग्राहकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपला नेमका ग्राहक कोण आहे ? त्याची नेमकी काय अपेक्षा आहे? तो कसा विचार करतो? त्याला फायदा होईल असे आपण काय करू शकतो, अशा अनेक गोष्टींचा विचार करून ब्रॅण्डींग, अॅडव्हर्टायझिंग करणे खूप गरजेचे आहे. काळजीपूर्वक, विचारपूर्वक, विश्वासपूर्वक आणि दिलेल्या वचनांची पूर्तता करतच ग्रॅण्ड घडत असतो… आणि मला खात्री आहे तुम्ही याच पध्दतीने ब्रॅण्डींग करत असाल किंवा यापुढे कराल. कराल ‘प्रॉमिस’ ?

ज्ञानेश शिंदे

क्रिएटिव्ह आर्टिस्ट अॅण्ड अॅण्ड कन्सल्टंट
मो.९८२२२ ४९५७७
Email: designaddict1@gmail.

error: Content is protected !!