कार्यसंस्कृतीनेच यश मिळते
वाळवंटातील स्वर्ग : दुबई
दुबई शहर वीस वर्षांपूर्वी वाळवंटाचेच शहर होते. आज जगात एक नंबरचे श्रीमंत व सर्वात जास्त पर्यटक भेट देणारे शहर म्हणून दुबईची ओळख आहे. वाळवंटात नंदनवन फुलविण्याची किमया झाली ती एका व्यक्तीच्या जिद्दीने व ध्येयवादाने. ती व्यक्ती म्हणजे शेख मोहंमद बिन रशीद… दुबईचे राजे-पंतप्रधान, ते कायम म्हणायचे, “मला दुबईला जगातील पहिल्या क्रमांकाचं शहर बनवायचं आहे. जगात जे जे आहे, ते सर्व दुवईत असायलाच हवं.” या जिद्दीतूनच आज दुबई जगातील प्रथम क्रमांकाचे शहर बनले आहे.
- बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईत आहे. १६० मजले व २७२० फूट उंची असलेल्या या इमारतीत रेस्टॉरंट, लिफ्ट अशा दहा गोष्टी जगात नंबर एक आहेत.
- बूर्ज अल्अरब हे जगातील सर्वात महागडे, श्रीमंत असे सेव्हन स्टार हॉटेल आहे. या ठिकाणी ५६ मजले आहेत. ते १०६० फूट उंच आहे. येथे फक्त चहा प्यायचा, तर बारा हजार पाचशे रुपये मोजायची तयारी ठेवावी लागते. फक्त पाहायचे असेल, तर दोन हजार रुपये आकारण्यात येतात, त्यासाठीही अगोदर बुकिंग करावे लागते.
- पाम जुमेरा ही पाम (नारळ) झाडासारखी समुद्रातील एक कॉलनी आहे. जगातील सर्वात महाग वास्तव्य या ठिकाणी आहे. तेही सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांसह,
- दुबई मॉल हा जगातील सर्वात मोठा मॉल आहे.
- दुबई फ्रेम ही ४९२ फूट उंचीची सोनेरी फ्रेम आहे. जगातील सर्वात सुंदर व रुंद फ्रेम म्हणून तिची ओळख आहे.
- ‘मिरॅकल गार्डन’ हे जगातील सर्वात सुंदर गार्डन आहे. २५० प्रकारची फुलझाडे येथे बाराही महिने फुललेली असतात.
- ‘गोल्ड सुख’ हे जगातील सर्वात मोठे व २४ कॅरेट सोन्याचे मार्केट आहे.
- ‘थ्री डी बिल्डिंग’ हे एक अनोखे शहर आहे. यात एक इमारत दुसऱ्यासारखी नाही. आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना आहे.
- ‘डेजर्ट सफारी’ हेसुद्धा दुबईचे एक प्रमुख आकर्षण आहे. यात रस्त्याच्या बाजूला व दुभाजकामध्ये अतिसुंदर रंगांची नैसर्गिक फुले आहेत.
झिरो क्राईम व टॅक्स फ्री शहर
दुबई हे फाईनवर चालणारे शहर आहे. फाईन म्हणजे दंड तुमच्याकडची कार तुम्ही स्वच्छ न करता रस्त्यावर आणली, प्रिव्रा क्रॉसिंगच्या पुढे फक्त काही इंच गाडी थांबविली, तर फार मोठा दंड भरावा लागतो. तेचील पोलिसांकडे मर्सिडीज कंपनीच्या गाल्या आहेत. लोकसंख्येपैकी दहा टक्केच स्थानिक आहेत. चाळीस टक्के भारतातील व बाकीचे पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स अशा देशांतील आहेत.२९ फेब्रुवारी २०२० ते ५ मार्च २०२० या कालावधीत मी तिसऱ्यांदा दुबईला गेलो होतो. प्रा. नामदेवराव जाधव सरांनी विश्व शिवजयंती सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. दुबईतील नामांकित महाराष्ट्रीयन उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते. तिथे माझा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाला. एक दिवसासाठी आम्ही दुबईपासून १४० किलोमीटरवर असलेल्या आबूधाचीला गेलो. आबूधाचीला सर्वांत जास्त तेल विहिरी आहेत. महाराष्ट्रातील वर्धा येथील श्री. पेटकरसाहेब तिये आम्हाला भेटले, त्यांनी दुपारच्या जेवणावेळी आमच्याशी छान गप्पा मारल्या. आमच्यापैकी दोन-तीन जणांना त्यांनी त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. जाधव सर व मी त्यांच्या घरी गेलो. आबूधाबीच्या राजाच्या भव्य महालासमोरच निळाशार समुद्र व त्याच्या तीरावरील अतिउंच टॉवरमध्ये सतराव्या मजल्यावर ते राहत होते. ३२०० चौरस फुटांच्या त्यांच्या अति आलिशान फ्लॅटवर असताना मी पेटकरसाहेबांना विचारले, “येथे फ्लॅटचे भाव काय आहेत?” त्यांनी सांगितले, “परदेशांतील कोणालाही इथे प्रॉपर्टी विकत घेता येत नाही. भाड्याने लीजवर घ्यावी लागते.” मग मी त्यांना भाडे विचारले. त्यांनी सांगितले, “या फ्लॅटसाठी ६० लाख रुपये भार्ड द्यावं लागतं.” मी आश्चर्यचकित झालो. मनात विचार आला, ‘इतके भाडे भरणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती असेल?’ मी तसे त्यांना विचारलंही. त्यांनी सांगितले, ते एका तेलकंपनीत खूप मोठ्या पदावर काम करतात. सकाळी ५ ते दुपारी ३ यावेळेत ते नोकरी करतात. त्यांना सव्वा तीन कोटी रुपये पगार मिळतो. तेलकंपनीतील काम संपल्यावर ते दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत स्वतःचा बिझनेस करतात. फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून ते जगातील अनेक लोकांना शेअर मार्केटसंबंधी तसेच इतर विषयांवर सल्ला देतात. त्याचेही त्यांना सुमारे ३ कोटी रुपये मिळतात. आमच्या गप्पा झाल्यावर ते त्यांची गाडी घेऊन आम्हाला सोडायला दुबईला आले. ते स्वतः ड्रायव्हिंग करीत होते. मी पुन्हा कुतुहलाने विचारले, “तुमच्याकडे ड्रायव्हर नाही का?” त्यावर ते म्हणाले, “येथे ९९ टक्के स्वावलंबी, आत्मनिर्भर राहावे लागते.”
ड्रायव्हर, घरगडी, कामवाली ठेवायची असेल, तर त्यांना आपल्याच देशातून आणावे लागते. त्यासाठीचे नियम फार कडक आहेत. त्यामुळे ते शक्य होत नाही. नोकरी, व्यवसायासाठी दुबई अतिशय उत्तम शहर आहे. पण तिथे कष्ट, प्रामाणिकपणा, कार्यसंस्कृतीनेच काम करावे लागते. नसता दंड, शिक्षा भोगावी लागते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
