कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

आल्फ्रेड नोबेल

स्वीडनमध्ये जन्मलेला शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल याने स्फोटकांचा शोध लावून जगाला विध्वंसाच्या जवळ आणले. पण जेव्हा नोबेल बाथरूमध्ये पडून मरण पावला, तेव्हा त्याच्या हातात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने लिहून ठेवले होते की, त्याच्या संपत्तीतून ५ पारितोषिके दिली जावीत. त्यापैकी एक पारितोषिक जागतिक शांततेसाठी सर्वोत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तीला किवा संस्थेला देण्यात यावे. हेच ते शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक. ज्याला जगात मोठा मानसन्मान आहे. याच चिठ्ठीत नोबेल यांनी जीवनाची काही तत्त्वे मांडली. त्यांनी लिहिले की, तुमच्यामागे तुम्ही काय सोडू इच्छिता.. द्वेष, मत्सर, अविश्वास, आळस, ईर्षा की मैत्री, प्रेम, संस्कार, खरेपणां का एक चांगली कार्यसंस्कृती, ज्या कार्यसंस्कृतीमध्ये विश्वास असतो अविश्वास नसतो. मैत्री असते वैर नाही, प्रेम स्नेह असतो द्वेष, ईर्षा नसते. उत्तर असते प्रश्न नाही, शांती असते अशांती नाही. हाताखाली काम करणारा क्षुद्र व वरचा उच्च प्रतीचा असा भेदभाव नसणाऱ्या ठिकाणीच कार्यसंस्कृती आनंदाने नांदते.

सिंगापूर

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास पंधरा वर्षांनी मलेशियामधून सिंगापूर हा स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. सिंगापूर हे एक बेट आहे. २२ बाय ४४ किलोमीटर इतक्या छोट्या क्षेत्रफळाचा हा देश. त्याच्या चारही बाजूंनी समुद्र आहे. तिथे पिण्याचे पाणीही आयात करावे लागते. २००४ मध्ये आमच्या लाईफ लाईन कंपनीच्या पन्नास जणांच्या एका ग्रुपसह मी मलेशिया, सिगापूरला भेट दिली. तिथे आम्हाला एक सत्तरवर्षीय गाईड माहिती सांगत होता, तुमच्याकडे म्हणजे भारतात अनेक ‘लालू’ आहेत. परंतु आमच्याकडे आलू (बटाटा) सुद्धा नाही.” तरीही त्यावेळी सिंगापूर डॉलरचा भाव वीस रुपये होता व आता तो त्रेपन्न रुपये झाला आहे. दुरिझम व ट्रेडिंग हा सिंगापूरचा मुख्य व्यवसाय आहे. येथील लोकसंख्या पन्नास लाखांच्या आसपास आहे. परंतु दरवर्षी दोन कोटी लोक सिंगापूरला भेट देतात. या देशात जीएसटी पाच टक्के आहे, तोही विमानतळावर परत मिळतो. फिरण्यासाठी व खरेदीसाठी अनेक देशांचे लोक तिथे जातात. मी स्वतः सात वेळा सिंगापूरला गेलो आहे. तिथे शून्य टक्के गुन्हेगारी, स्वयंशिस्त व अत्यंत स्वच्छता आहे. तिथेच ‘लिटिल इंडिया’ नावाचा भाग (कॉलनी) आहे. तिथे जास्त भारतीय राहतात आणि नेमकी त्याच परिसरात थोडीफार अस्वच्छता दिसते. तेथील मॉल, दुकाने, हॉटेल्स चोवीस तास उघडे असतात. ‘मुस्तफा मार्केट’ हा भव्यदिव्य मॉल आहे. मी २००४ ला प्रथमच हा मॉल पाहिला. तिथे सेल्समन नसतो. आमच्या गाईडने आम्हाला सांगितले होते की, “इथं सगळं काही पाहण्यासाठी खुलं आहे. परंतु बिल न देता

चुकूनही एखादी वस्तू बाहेर आणायचा प्रयत्न करू नका. येथे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात जर चुकीचे प्रकार करताना दिसला, तर मोठी शिक्षा होते.” आम्ही तो मॉल फिरून बाहेर निघत असताना एका बाईने लिपस्टिक चोरून ती आपल्या ब्लाऊजमध्ये लपवून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. ती बाहेर पडत्त असतानाच अलार्म वाजला. तिथल्या सिक्युरिटीने लगेच त्या बाईला ताब्यात घेतले. सुरुवातीला ती बाई चोरी मान्य करायला तयारच नव्हती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तिच्या पतीलाही बोलावून घेण्यात आले. तो आल्यावर सीसीटीव्ही फुटेज त्यांना दाखविण्यात आले. त्यात ती बाई लिपस्टिक चोरत असल्याचे स्पष्ट दिसत होते. आता चोरी उघड झाल्यामुळे पोलिसांनी नियमानुसार ‘दोन लाखांचा दंड व दोन दिवस जेल अशी शिक्षा भोगावी लागेल’ असे स्पष्टपणे सांगितले. आता ती बाई गयावया करायला लागली. अशा टाईट सिक्युरिटीमध्ये किरकोळ चोरी करण्याचा तिचा प्रयत्न फोल ठरला. नंतर सहज चौकशी केली तर कळले, ती સ્વસ્ટિીમ बाई भारतीय होती. ती मध्यप्रदेशातील होती. तिचा पती भारतातील श्रीमंत कारखानदार होता. असे संस्कार व कार्यसंस्कृती असेल, तर आपला देश प्रगती कशी करणार?

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!