कार्यारंभ करा, संघर्ष करा, श्रद्धा बाळगा…
यशासाठी अकरा उपयुक्त गोष्टी…
१. सकारात्मकता सतत सकारात्मक राहणे यशासाठी आवश्यक असते. एखाद्या अपघातात एखाद्याचा एखादा अवयव निकामी होतो. पण याही परिस्थितीत सकारात्मक राहिले पाहिजे. माझे सर्वस्व संपलेले नाही. अजूनही माझ्याकडे इतर चांगले अवयत आहेत, ज्याच्या जोरावर मी चांगले जगू शकतो, अशी सकारात्मक दृष्टी बाळगली पाहिजे.
२. पेंशनने काम करा कोणतेही काम हाती घ्याल, तेव्हा ते एका पेंशनने करा. त्या कामाच्या प्रेमात पड़ा. कोणासाठी व्यवसाय करणे ही आवड असेल, कोणाला खेळाची, वाचनाची, लिखाणाची आवड असेल, कोणाला गाण्याची, संगीताची, अभिनयाची आवड असेल. जी काही आवड असेल त्यात झोकून देऊन काम करा. असे केल्यानेच क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, अभिनयात अमिताभ बच्चन, गायनात लता मंगेशकर, उद्योगक्षेत्रात अंबानी, सामाजिक कार्यात बाबा आमटे, अण्णा हजारे अशी अनेक मंडळी यशस्वी झाली आहेत.
३. वाचाल, तर वाचाल माझ्या स्वतःच्या आयुष्यात पुस्तके नसती, तर मी आज इतका यशस्वी झालो नसतो, असे मला वाटते. लॉ ऑफ सक्सेस, यिक अँड ग्रो रिच यासारख्या पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल घडविले. अनेक पुस्तके वाचून मी ज्ञान मिळविले. त्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात केला. सरस्वतीला प्रसन्न करा, मग लक्ष्मीही प्रसन्न होते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले म्हणतात,
विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
प्रत्येक मनुष्याला जशी पोटाची भूक असते, तशी बुद्धीचीही भूक असते. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या जीवनातील पूर्णत्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक रुपयाची भाकर घ्या. भाकरीने आजचे पोट भरेल, पण उद्या-परवा नव्हे, तर कायमचे पोट भरण्यासाठी ज्ञान म्हणजे पुस्तकच उपयोगी पडेल.’
४. डायरी लिहा आवडणारे विचार, वाक्य ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर लिहून ठेवल्याने ते अधिक प्रभावी काम करतात. त्याचा मोठा परिणाम आपल्यावर होतो. मी व्यवसायानिमित्त अनेक पत्रे लिहिली. त्याची खूप सुंदर उत्तरेही मला मिळाली. ते वाचताना मला आणखी चांगले काम करायच बळ मिळते. मी माझ्या मुलांनाही खूप छोटी छोटी पत्रे कायम लिहीत असतो. माझे दिवसभराचे काम, लहानमोठे हिशेब, एखादा प्रसंग मी रोज डायरीत नोंद करून ठेवतो. असे केल्याने सकारात्मक परिणाम होतात, हे अनुभवाने सांगतो.
५. हाती घेतलेल्या कामाचा शेवट करा अनेकदा आपण आरंभशूर बनतो. काम हाती घेतो, पण तडीस नेत नाही. असे केल्याने अपयशच पदरी पडते. मी जे काम करतोय, ते सर्वोत्तम आहे, त्यातून मला यश, आनंद सगळे काही मिळणार आहे, असे समजून काम करा. मी स्वतः या तत्त्वाने काम केल्याने मी माझ्या कामाचा कायम आनंद घेत आलो आहे. त्यापाठोपाठ मला यशही मिळाले. काम सुरू केल्यावर शेवट होईपर्यंत थांबायचे नाही, हे तत्त्व मी कायम पाळले आहे.
६. कंफर्ट झोन सोडा मराठी माणसे ही कायम कंफर्ट झोनमध्ये राहायचा प्रयत्न करतात. थोडे जरी असुरक्षित वातावरण तयार झाले, तर ते अस्वस्थ होतात. त्यामुळेच मराठी माणसाची प्रगती खुंटते. तुमच्या खिशात पाचशे किंवा दोन हजारांची नोट असेल, तर तुम्ही स्वतःला सुरक्षित समजता. आणखी पैसे मिळविण्यासाठी जास्तीचे काम करावे, असे तुम्हाला वाटत नाही. हे टाळायचे असेल, तर खिशातील
पैसे खर्च करा, गुंतवणूक करा. रिकाम्या खिशाची अनसिक्युरिटी तुम्हाला कार्य करायला प्रेरित करेल. यशासाठी सतत टॉपवर राहण्याचा प्रयत्न करा. स्वातंत्र्यलक्यात लाखो लोकांनी योगदान दिले, पण तरीही स्वातंत्र्यलक्धाचे शिलेदार म्हणून मोजकीच नावे समोर येतात. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबू गेणू, चाफेकर, सावरकर.. हीच नावे सतत का समोर येतात? त्यांनी काय वशिला लावला होता? अजिबात नाही, त्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत नेतृत्व केले. सतत टॉपवर राहून काम केले, म्हणून त्यांची नावे पुढे येतात. गदीं नेहमी खाली असते. स्टेजवर, कळसावर गर्दी नसते, यशोशिखरावर तर अजिबातच गदीं नसते. म्हणून कायम तिथे राहण्याचा प्रयत्न करा.
७. व्यायाम व ध्यानधारणेत्य वेळ द्याच जी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फिट असते, ती मानसिकदृष्ट्याही फिट राहते. शरीरच जर रोगट, अनफिट असेल, तर मनही उत्साही राहत नाही. त्यामुळे तुमची प्रगती खुंटते. यासाठी व्यायामासाठी रोज किमान अर्धा तास वेळ काढा, जोडीला मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी ध्यानधारणाही नक्की करा. यामुळे तुमची कार्यक्षमता दुप्पट वाढते.
८. महिन्याला एक वाईट सवय सोडा व किमान एक चांगली सवय जोडा तुम्ही आज जे काही आहात व उद्या काय असाल, ते तुमच्या सवयीमुळेच असेल, यासाठी चांगल्या सवयी लावून घेणे व वाईट सवय सोडणे आवश्यक आहे. वाईट सवयी शोधा, महिन्याला किमान एक वाईट सवय सोडून द्या व एक चांगली सवय स्वतःमध्ये रुजवा. लवकरच तुम्ही सर्वगुणसंपन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
९. यशस्वी, सकारात्मक लोकांशी मैत्री करा उवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागला ही म्हण सर्वांनाच माहिती आहे. यासाठी नेहमी यशस्वी, सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा तुम्हीही त्यांच्यासारखेच व्हाल, त्यांच्या चांगल्या सवयी, गुण तुम्हाला मिळतील, यशस्वी लोकांनी निर्माण केलेल्या पदपथावरून चालण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या आचारविचारांची कॉपी (नक्कल) करायला खूप बुद्धिमत्तेची गरज नसते. थोडीशी अक्कल व थोडीशी नक्कल गरजेची असते. नवीन रस्ता तयार करणे तुलनेने अवघड असते, पण जुन्या रस्त्यावर चालणे तितके अवघड नसते. नवीन उद्योजकांनी जुन्या उद्योजकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली, तर पुढे कदाचित ते स्वतःचा वेगळा मार्गही तयार करू शकतील,
१०. टीव्ही, मोबाईलचा योग्य वापर टीव्ही, इंटरनेट, मोबाईल ही दुधारी शस्त्रे आहेत. त्याचा योग्य कारणासाठी वापर केला पाहिजे. या माध्यमातून जे जे चांगले घेता येईल, ते घ्या. ही माध्यमे माहिती व मनोरंजनापुरती मर्यादित असावीत, त्यांचे व्यसन लागू देऊ नका व मुलांना तर या बाबतीत जास्तच जपा,
११. कृतज्ञ रहा – तुमच्या ध्येयाला, विचारांना भावनात्मक जोड मिळणे महत्त्वाचे असते. तुमची आई आजारी आहे. तुमच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. पण तुम्ही भावनात्मक विचार केलात व म्हणालात, ‘आई आजारी आहे, पैसे नाहीत; पण मी आईवर चांगले उपचार करणारच!’ तर एक अनामिक शक्ती तुमच्या मदतीला नक्कीच येईल, कारण तुम्ही भावनिकदृष्ट्या त्यात गुंतलेले आहात. कार्याला प्रचंड गती हवी असेल, तर त्याला भावनेची जोड द्या. जो कृतज्ञ असतो, त्यालाच नेहमी भरभरून मिळत असते हे यशस्वितेचे मोठे गुपित आहे. आपल्याला मिळालेल्या यशाचे श्रेय आईवडिलांना, गुरुजनांना द्या. वाईट झाले, तर त्याची जबाबदारी स्वतःवर घ्या. असे केल्यास आनंद, समाधान भरभरून मिळते. दुःख कमी होऊन प्रगतीकडे वाटचाल होते. कष्ट सगळेच करतात. या कष्टाला आईवडिलांचे आशीर्वाद, जवळच्या लोकांच्या सदिच्छांचे पाठबळ याची जोड मिळाली पाहिजे. जीवनात नाते जपायला शिका. त्यातही दोनच नाती अशी असतात, जिये तुम्ही कितीही चुका केल्या, तरी त्या नात्यात अंतर पडत नाही. ते तुम्हाला सतत सुधारत असतात. ती नाती म्हणजे आईवडिलांचे व गुरुजनांचे. बाकीच्या नात्यात चुकीसाठी आधी
तुम्हाला शिक्षा करतात व नंतर आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळते.जगात माझ्न्यापेक्षा अनेक हुशार माणसे नक्कीच आहेत, माझ्यापेक्षा जास्त कष्टाळूही असतील, पण स्यांच्या मानाने मला हजारपट यश, पैसा, मानसन्मान सगळे काही मिळाले. याला कारण माझी हुशारी नसून मला मिळालेले आईवडिलांचे आशीर्वाद, आजीआजोबांचे कृपाशीर्वाद, भगवान महादेवाची कृपादृष्टी, असंख्य लोकांच्या सदिच्छा व सहकार्य या गोष्टी कारणीभूत आहेत, असे मला मनोमन वाटते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
