ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय
तुम्ही नोकरी वगैरे शोधण्याचा, करण्याचा प्रयत्न का केला नाही, की तुम्हाला व्यवसायच करायचा होता?
सुखाची नोकरी करावी, ‘दिन जाव पैसा आव’ हे सगळ्यांना आवडतं.चांगले वाटते. मलाही वाटायचे की आपणपण नोकरी करावी, पण माझ्या अशा अवस्थेकडे, माझ्या शिक्षणाकडे बघून मला फारफार तर एखाद्या संस्थेत चपराशाची नोकरी मिळाली असती. शिवाय नोकरीसाठी वशीला लावा, भरमसाठ पैसे द्या, पुन्हा अनुदान मिळेपर्यंत फुकट नोकरी करा, तशी आपली आर्थिक स्थिती नव्हती.
दुसरे नोकरीत लोक लंगडा-लंगडा म्हणून हेटाळणी करतात हो! सहानुभूती व हेटाळणी हे दोन्ही मला नको होते. म्हणून काही तरी लहानमोठा धंदा करावा असेच माझ्या मनात होते. परंतु थेट यात्रा कंपनीच सुरू करावी, असे तुम्हाला का वाटले असे मी त्याला विचारले.
त्यावर तो म्हणाला, ग्रामीण भागात धंदा म्हटले की किराणा दुकान किंवा आटा चक्की असे व्यवसायच डोळ्यांसमोर येतात, पण या व्यवसायांनाही भांडवल लागते. आपल्याकडे भांडवल नव्हते. ते घरातून घ्यावे अशी घरचीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला धंदाच करायचा होता आणि तोही बिनाभांडवली.
लेखक- – एस. पी. नागठाणे (उद्योजक वक्ता)
7028963255
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
