ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय
मग हाच धंदा तुम्हाला कसा काय सुचला?

हा धंदा काही सुचला वगैरे नाही, पण कमीशन बेसीसचा, कमी भांडवली किंवा बिनाभांडवलाच्या धंद्याचा शोध अहोरात्र सुरू होता. नशीब म्हणतात ना साहेब, ते असतं बरं का! तुमची ईच्छाशक्ती तीव्र असेल तर दैवही तुमची मदत नक्कीच करते. अगदी तसेच झाले. माझा दूरचा एक पाहुणा पुण्यात एका ट्रॅव्हल कंपनीत टूर ऑपरेटर म्हणून काम करत होता.

तो एकदा मला म्हणाला, चल तुला तिरूपती, श्री शैल्यम् दाखवून आणतो. माझ्याकडे पैसेही नव्हते आणि रिकाम्या खिशाने उगाचच काय देव देव करायचे. तर तो म्हणाला की एक पैसा देऊ नकोस, खायची-प्यायचीही काळजी करू नकोस. मी त्याच्यासोबत गेलो. दहा दिवस यात्रेत त्याने मला हरकाम्या म्हणून वापरले. ऐनवेळी त्याच्या साहाय्यकाने दांडी मारली होती त्यामुळे माझी वर्णी लागली होती.

दहा दिवसात यात्रेचे टप्पे, लॉज, धर्मशाळा, त्यांचे बुकींग, रेट वगैरे सगळी माहिती घेतली. बसच्या ड्रायव्हरशी मैत्री करून बसभाडे वगैरेची माहिती घेतली. तिथल्या लोकांचे नंबर घेतले. परत आल्यावर शांतपणे बसून गणित मांडले आणि मला लक्षात आले की हा धंदा आपण करू शकतो.

लेखक- – एस. पी. नागठाणे (उद्योजक वक्ता)

7028963255

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!