जगमान्य प्रेरणादायी घटक

५. Job Security : नोकरीची हमी

महाराजांच्या सैन्यात भरती होणं म्हणजे कायम नोकरीची हमी होती आणि म्हणूनच फक्त मराठी लोकच नाही तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, कन्नाडी, भिल्ल, लमाण, गौंड, गुजराथी, राजस्थानी लोकांनी महाराजांच्या पदरी नोकरी केली. परमनंट नोकरी हा घटक महाराजांनी एवढ्या प्रभावीपणे वापरला की विजापूरची नोकरी सोडून ७०० पठाण आले. पोर्तुगीजांची नोकरी सोडून ४०० पोर्तुगीज स्वराज्यात आले. अगदी औरंगजेबासारख्या श्रीमंत बादशहाचे ४००० घोडेस्वार १६७४ ला मोगलांची मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वराज्यात आले. महाराजांनी १६४५ पासून सैन्यभरती केली आणि राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांचे म्हणजे १६७४ साली जवळपास २५०,००० खडे सैन्य होते.

म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्यांनी नोकरीची हमी दिली आणि महाराजांची माणसं, सहकारी कर्मचारी सांभाळण्याची पद्धत एवढी चांगली होती की उभ्या आयुष्यात एकही माणूस महाराजांची नोकरी सोडून गेला नाही की महाराजांवर नाराज होऊ शकला नाही. कायम नोकरीच्या बदल्यात कायम रयतेनी स्वराज्याला कायम निष्ठा दिली. याला म्हणतात प्रेरणा नाहीतर आज बघा काय परिस्थिती आहे. लोकं मोठ-मोठ्या पगारांच्या नोकऱ्या सहा-सहा महिन्यात बदलत असतात. कारण कायम नोकरीची हमी कोणी देत नाही. अहो कंपनीचा भरवासा नाही स्वतःला तर ते तुम्हाला कशाला ठेवतील कायम नोकरीला.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!