५२.घाई नको! धीर धरा
Rom was not built in a day किंवा पी हळद हो गोरी असे कधी होत नसते. त्यासाठी लागतो संयम किंवा धीर. म्हणूनच म्हणतात धीरज का फल मीठा होता है। ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा चार तासांनी पुढे आहे. याचा अर्थ भारत चार तासांनी मागे आहे, असा होत नाही. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ४७ व्या वर्षी रिटायर होतात तर जो बायडन ७९ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष होतात, हे धीर धरल्यानेच ! कोळशावर चालणारी रेल्वे सुरू झाल्यावर तिला
इनपुट म्हणजे कोळसा जास्त लागतो. एक्स्लेटर पूर्ण दाबून खूप धूर सोडते पण सुरुवातीला स्पीड पाच दहा किलोमीटरचीच असते; पण १० मिनिटांनंतर इनपुट कमी व आऊटपुट म्हणजे स्पीड १०० किलोमीटरची असते. मोठ्या यशाचेही तसेच असते. सुरुवातीला इनपुट म्हणजे पैसा, मेहनत, वेळ खूप जास्त देऊन नफा अत्यंत कमी असतो; पण धीर धरून सातत्याने काम केल्यास व बिझनेस सेटल झाल्यावर इनपुट कमी, पण आऊटपुट अर्थात नफा, मानसन्मान जास्त मिळतो. म्हणून धीर धरून संयमाने कार्य करा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
