३. Initiative पुढाकार घेता आला पाहिजे
एका यशस्वी नेत्याचा हा स्वभावतः गुणधर्म असतो. कोणतीही अडचण संकट, संधी आली की कोणीही न सांगता जेव्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीमतेच्या जोरावर पुढाकार घेऊन निर्णय घेता त्या क्षमतेलाच म्हणतात Initiative. प्रश्न, संधी अडचण समोर आल्याबरोबर या यशस्वी नेत्याला उत्तर शोधावे लागते. ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरु करावी लागते. पुढाकार घेण्याची क्षमता, हिंमत छाती नसेल तर चुकूनही पुढारी होण्याची कल्पना मनात आणू नका. पुढे जातो तो नेता आणि मागे जातो तो अनुयायी किंवा कार्यकर्ता. आता पुढाकार घेणं म्हणजे नक्की काय ते आणखी स्पष्ट करतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेणं दुसऱ्याने शहाणपणा शिकवण्याच्या आधी आणि दुसऱ्याचा शहाणपणा ऐकल्यानंतरही स्वतःच्याच निर्णयावर ठाम राहून तो तडीस नेणे. अरे निर्णय चुकला तरी चालेल ! अरे चुकला नाही तर अनुभव कशातून येणार आणि अनुभव नसेल तर योग्य निर्णय कशातून घेणार! परंतु
म्हणून आयुष्यभर फक्त अनुभव घेत बसू नका.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
