२२. शारीरिक ऊर्जा वाढवा
त्यासाठी सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठायची सवय लावा. सुरुवातीला फक्त आजच्यापेक्षा अर्धा तास लवकर उठण्याचा दृढनिश्चय करून तसा अलार्म लावा. तो दूर ठेवा म्हणजे तुम्हाला उठावंच लागेल. असे २१ दिवस केले कि ती सवय बनून जाते. तुम्ही इतिहासात पाहिल तर सर्व यशस्वी लोक हे अर्ली रायझर म्हणजे लवकर उठणारे होते. पहाटे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही जो विचार आणि कार्य कराल त्यामध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळते. हा
माझा स्व अनुभव आहे. नेहमी सूर्योदयानंतर उठल्यामुळे दरिद्री येते. आजचे काही तरुण रात्री उशिरापर्यंत बिनकामाचे सोशल मीडिया, टीव्ही आणि इतर गोष्टीसाठी जागून, सकाळी उशिरा उठण्याच्या सवयीमुळे त्यानी ७ ते ८ तास काम जरी केले तरी ते थकून जातात. उशिरा उठल्यामुळे त्यांना शारीरिक व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा आणि ध्यान धारणे साठी वेळच नसतो. निरोगी जीवनासाठी सर्वोत्तम औषध आहे तो म्हणजे योग योगामुळे मन, मेंदू, बुद्धी आणि आत्म्याला प्रचंड ऊर्जा मिळते. योगाशिवाय मनुष्य सदृढ, निरोगी आणि आनदी जीवन जगूच शकत नाही. म्हणून तुम्ही लहानपणापासून व्यायामाची आणि योगाची सवय लावल्यास तुम्ही शेवटपर्यंत सुखी, आनदी आणि निरोगी जीवन जगू शकता.
वनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
