४. Innovative : नावीन्यता
अरे सूर्य मावळला तर काही मिनीटात त्याची प्रभा संपते इथे हा सूर्य एक तर कधीच मावळत नाही आणि मावळला तरी त्याची प्रभा कधी संपत नाही. म्हणूनच महाराजांनी त्यांच्या अनुयायांना मावळा या नावाने संबोधले. पराक्रम ज्यांचा कधीही मावळत नाही तोच मावळा आणि अशा न मावळणाऱ्या लोकाचं नेतृत्व करतो तोच छत्रपती सिंहासनपती. असामान्य बुद्धीमान लोकांचं नेतृत्व करणारा असा जगमान्य राजा, जनसामान्यांचा राजा . म्हणून मित्रांनो आयुष्यात नेहमी नव-नवीन गोष्टी शिका, अंमलात आणा आणि कायम चर्चेत रहा. प्रसिद्धी झोतात रहा. मग ते अंगावर किलो किलो सोनं घालून किंवा अंगावरील कपडे काढून काय करता येईल ते करा, पण चर्चेत रहा. लोकशाहीत गाढवावर बसलं तरी गाढवांची इज्जत वाढते आणि आपल्यालाही प्रसिद्धी मिळते. सगळेच घोड्यावर बसतात म्हणून तुम्ही नवीन प्रयोग करायचा. गाढवावर बसायचे आणि पाटी लावायची यांच्यापेक्षा कोणी नेता प्रामाणिक मेहनत करणारा असेल तर त्यालाच हे गाढव बक्षीस देऊ म्हणून असल्या काहीतरी भन्नाट आयडिया लढवा. कधी पाण्याच्या टाकीवर चढा, झाडावर चढून बसा, मोबाईल टॉवरवर चढा नाहीच जमलं तर असं काहीतरी करा. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरा है ही नाही जमलं तर त्यांच्या विरुद्ध माहितीचा अधिकार टाकून काही उद्योग करा आणि प्रसिद्ध व्हा. पण हे एकदाच जमेल पुढचा प्रवास मात्र स्वतःच्या कतृत्वाने करा. कारण दुसऱ्यांच्या तंगड्या ओढून आपले हात मजबूत होतील. परंतु पाय नाही आणि जगात न सन्मानानं उभं राहण्यासाठी पुढे जाण्यासाठी पाय लागतात हेच लक्षात ठेवा. हे पाय म्हणजेच नवीन वाटा, नवीन दिशा आणि नवीन विचार अर्थात नाविन्यता.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
