२४.उद्योजक किंवा व्यावसायिक बना
तूम्हाला उद्योजक, व्यावसायिक व्हायचे असेल तर सर्वप्रथम स्वतः ची ओळख करून घ्या. Who Am I? अर्थात मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला आहे ते ठरवा. त्यानंतर तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा. निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम व प्रतिभावंत व्हा. आपल्या क्षेत्राचे तांत्रिक ज्ञान घ्या. ते मिळविण्यासाठी अशा व्यवसायाच्या सर्वोत्तम ठिकाणी अनुभवासाठी वर्ष दोन वर्षे नोकरी करा. त्यानंतर जो प्रॉडक्ट, जी सेवा तुम्ही देणार आहात, त्याची विक्री कला शिकून घ्या. त्या व्यवसायाचे अर्थशास्त्र अर्थात नफा-तोटा समजून घ्या. त्यानंतर छोटेखानी अर्थात स्मॉल स्केलमध्ये व्यवसाय चालू करा. त्यातून तुम्हाला जसजसा अनुभव येईल तसतशी व्यवसायात हळूहळू प्रगती करीत तुम्ही मोठे उद्योजक, व्यावसायिक व्हा. मी तसाच उद्योजक झालो, तुम्हीही तसेच व्हा. या संबंधी सविस्तर माहितीसाठी माझा उद्योजक होतानाचा व्हिडिओ N.B.Dhumal या यू ट्यूब चॅनलवर नक्की पहा.
वनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
