९. माणसं हाताळण्याचं कौशल्य
जशी जशी तुमच्याकडे अनुयायी, कार्यकर्ते यांचा समूह वाढत जाईल तसं तसं तुम्हाला त्यांना हाताळण्यासाठी तेवढ्या उच्च दर्जाचं माणसं हाताळण्याचं कसब वापरावं लागेल आणि तुम्हाला जर कायम यशस्वी नेता व्हायचं असेल तर तुम्हाला कायम सहकारी अनुयायी यांच्या संपर्कात रहावं लागतं. त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. आता हा संवाद व्यवस्थीत असेल तर माणसं आपल्याकडे टिकतील आणि त्यात चूक झाली तर ते आपल्याला रामराम ठोकतील. तुम्हाला त्यांची गरज आहे आणि त्यांना तुमची गरज आहे. मग दोघांना जोडणारा धागा काय आहे हे लक्षात घेऊन तो ऋणानुबंध टिकवा. कोणीतरी तुम्हाला नेता म्हणून स्वीकार करतंय त्याचे ऋण माना आणि त्यांचा ऋणानुबंध टिकवा. अगोदर तुम्ही कार्यकर्त्यांकडे जात चला आणि जेव्हा तुमचं कामकाज वाढेल तेव्हा कार्यकर्त्यांना तुमच्याकडे बोलावतं चला, कारण आता तुम्ही नेता झालेला असता. तुम्ही लोकापर्यत पोहोचलात तर लोकं तुमच्यापर्यंत पोहचतील हे लक्षात ठेवूनच आपण जाण्याचा आणि येण्याचा मार्ग प्रशस्त करणं म्हणजेच माणसं हाताळण्याचं कौशल्य.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
