९. माणसं हाताळण्याचं कौशल्य
तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, रामजी पांगेरा, मुरारबाजी, प्रतापराव अशी महाराजांसाठी खर्ची पडलेली माणसं आपणाला थोडीफार माहीत आहेत. परंतु उभं आयुष्य स्वराज्य विचारानं प्रेरीत होऊन महाराजासोबत राहिलेली लाखो लोक आम्हाला कुठं माहित आहेत म्हणून तर आज आम्हाला १०-२० लाख रुपये खर्च करुन व्यवस्थापन म्हणजे काय हे शाळेत जाऊन शिकावं लागते. हेच जर आपण महाराजांच्या चरीत्राचा अभ्यास केला असता तर कमी पैशात आम्ही यशस्वी व्यवस्थापक, उद्योजक सहज झालो असतो. कारण या चरित्रातून आम्हाला माणसं हाताळण्याचं कौशल्य शिकता आलं असतं. चला हरकत नाही. देर हो गई लेकीन अंधेर नही देर आये दुरुस्त आये. म्हणुनच तर मी लिहितोय आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्यावर आधारीत हे पुस्क वाचताय. अहो ही तर यशाची सुरुवात आहे. पुढे आपल्याला मोठ मोठी शिखरे साद देतील तीही पादाक्रांत करायची आहेत आपल्यासाठी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आहेतच की! वाट चुकली तर बोट धरुन आपल्याला सरळ मार्गावर आणायला.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
