३२.रिच डॅड – पुवर डॅड समजून घ्या
श्रीमंत होण्यासाठीचे जगात सर्वात जास्त वाचले गेलेल्या ‘रिच डॅड’ पुवर डेंड’ या पुस्तकाचे लेखक कियोसकी हे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. ते म्हणतात, गरीब लोक पैशासाठी काम करतात व पैसा हा श्रीमंत लोकांसाठी काम करतो. गरीब जास्त गरीब व श्रीमंत जास्त श्रीमंत होतात. कारण गरीब लोक व्यवसायातील संधी ओळखत नाहीत. कारण शाळा, कॉलेजमध्ये शिकविले जाते, की शिक्षण घेऊन तुम्ही नोकरी करून पैसे कमावण्यासाठी काम करा. खरे तर शाळा-कॉलेजमध्ये शिकविले पाहिजे, की तुम्ही स्वतःसाठी काम करा व उद्योग, व्यवसायातून नोकरीपेक्षाही जास्त पैसे कमवा. नोकरीच्या पगारातून तुम्ही तुमचे जीवन जगू शकता; पण उद्योग – व्यवसायातून तुम्ही अनेकांना नोकऱ्या देऊन श्रीमंत होऊ शकता. म्हणून रिच डॅड- पुवर डॅडला समजून उद्योग-व्यवसाय करा व जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
