१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य
२. साधनसामग्रीची जुळवाजुळव करा
आपली भन्नाट कल्पना फक्त कागदावर लिहून ठेवू नका. डोक्यात आलेली कल्पना लगेच कागदावर उतरवून काढा आणि लगेच आढावा घेऊन ती कल्पना अस्तीत्वात आणण्यासाठी कोणकोणत्या साधनसामग्री लागतील त्यांची यादी करा आणि जुळवाजुळव करायला सुरुवात करा. ही साधन सामग्री म्हणजे काय तर सांगत्तो. 3 m man, machine, material and entreprenuership आता तुमच्या डोक्यात भन्नाट आयडिया आहे म्हणजे तुम्ही झाला entreprenuer म्हणजे उद्योजक. म्हणजेच धाडसी माणूस बाकी राहिल्या तीन गोष्टी त्या म्हणजे ते काम करायला लागणारी माणसं मशीन आणि ज्यायोगे मशीन आणि माणसं गोळा ज्या गोष्टीने जमा करता येतात ते पैसे. सर्वात आधी काय गोळा करायचे ते परिस्थितीनुसार तुम्ही ठरवा. कधी पैसे अगोदर जमतील कधी मशीन अगोदर मिळेल का कधी काम करणारी माणसं लगेच मिळतात. काहीही असो घ्या तीन गोष्टी एकापाठोपाठ किंवा एकदम कसेही परंतु वेळेत याची जमवाजमव झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल मशीन म्हणजे काय तर माणसाचा शीण कमी करते ती मशीन. पण यासाठी थोडा जास्त पैसा लागतो. पण त्याचा शीण एकदाच होतो. आणि आपल्या यशाचा सीन बदलून जातो.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
