जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य

    ४. नियंत्रण करणे

तुम्ही पैसा, माणसं मशीन कामाला लावून स्वस्थ बसू नका आणि झोप तर अजिबात काढू नका. कारण या तिन्ही गोष्टींवर जर नियंत्रण नसेल तर त्या तुम्हाला झोपविल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही डोळ्यात तेल घालून कायम सज्ज असता तेव्हाच तुमचा पैसा योग्य दिशेने काम करतो. माणसं आपलं काम व्यवस्थीत पार पाडतात आणि मशीन आपलं काम वेळेत करुन देतात. म्हणून एक कुशल प्रशासक होण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगिली पाहिजे. पैसा, माणसं आणि मशीन यांनी आपल्याला नियंत्रीत करणं म्हणजे आपण अनुयायी किंवा कर्मचारी होणं आणि आपणच पैसा, माणसं आणि मशीन यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे नेता किंवा मालक होणं.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!