१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य
४. नियंत्रण करणे
लक्षात ठेवा श्रीमंत माणसं किंवा नेते पैशाने काम करतात आणि अनुयायी किंवा कर्मचारी पैशासाठी काम करत असतात आणि मला वाटतं तुम्ही पहिल्या गटात मोडता. पैशाने काम करुन घेण्यासाठी मशीन आणि माणसं लावणारे व्हा. आता पैसा कसा कमवायचा हेच म्हणाल तर याचे उत्तर मुद्दा क्रमांक एक मध्ये आले ना! भन्नाट कल्पना करा. ज्याने पहिलं विमान बनविलं. ज्याने पहिला संगणक बनविला. ज्याने पहिला मोबाईल बनविला तिच माणसं सगळ्यात श्रीमंत आहेत बरं. म्हणजे काय तर आयडिया कोणतीही असो अगदी भाजी विकण्याची चैन स्टोर उघडून वॉरेन बफे श्रीमंत झाला ना! भंगार विकून माणसांनी स्वतःचे विमान खरेदी केले ना! आणि तुम्ही गरीबासारखे
विचार करुन कुठे गरीब राहता. लक्षात ठेवा गरिबीचा विचार करणारे गरीबच राहतात आणि श्रीमंत होण्याचा विचार कायम करणारे लोक एक ना एक दिवस श्रीमंत होतातच. आपली अडचण अशी आहे की आपण फक्त काम करतो विचार करत नाही. कामातून वेळच मिळत नाही असा म्हणणारा माणूस मजूरच असला पाहिजे. आणि जो आपला वेळ हक्काने, कोठेही देऊ शकतो आपल्या सोईने वागू शकतो तोच श्रीमंत असतो. कारण त्याचा विचार स्वतंत्र असतो तो नोकरी मागत बोंबलत फिरत नाही. प्रसंगी बोंबील विकायची कंपनी काढून श्रीमंत होत असतो म्हणून दररोज काहीतरी नवीन शिका. नवीन ज्ञान, तत्वज्ञान तंत्रज्ञान असं काहीतरी स्वतःच्या पदरी वाढवा. आपोआप तुमचे पंख विस्तारतील आणि ते नियंत्रणात ठेवता आले तर अख्खं आकाश तुमचंच आहे.
सामान्य कल्पनेतून अफाट यश मिळवूण देणाऱ्या अनेक प्रेरणादायी गोष्टी जगात घडल्या आहेत, घडत असतात. त्यातील एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगितली गेली पाहिजे म्हणजे तुमचा आत्मविश्वास लगेच तुम्हाला कार्यप्रवण करु शकेल.
मेलेला उंदीर हेच भांडवल घेऊन यशस्वी झालेल्या तरुण उद्योजकाची गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. शोधा ती गोष्ट. नाहीच सापडली तर मी सांगतो.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
