३७. वेळ संपत आली आहे..

३७. वेळ संपत आली आहे..

यशस्वी आणि श्रीमंत लोक रोज सूर्योदयापूर्वी उठून महत्त्वाची कामे करतात. म्हणूनच ते यशस्वी होतात. तुम्हालाही कमीत कमी वेळेत जास्तीतजास्त कामे करून जास्त आऊटपुट काढायचे असेल तर हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क करावेच लागेल. त्यासाठीचे काही नियम तुम्हाला पाळावेच लागतील. ते असे,

१) आजचा दिवस परमात्म्याने दाखविला म्हणून त्यांचे आभार माना. २) स्वतःला शाब्बासकी द्या की मी नंबर वन आहे आणि नंबर वनच
राहणार.

३) सूर्योदयापूर्वी उठून आपली स्वतःची कामे अंथरूण, पांघरूण व्यवस्थित साफ करून स्वतः शिस्तबद्ध आहोत हे स्वतःलाच दाखवून द्या.

४) एक-दोन ग्लास गरम पाणी संथ गतीने प्या.

५) ४०/५० मिनिटे वर्कआउट म्हणजे जिम, स्विमिंग, सूर्यनमस्कार करून स्वतःला शारीरिक तंदुरुस्त ठेवा.

६) कमीत कमी २०/३० मिनिटे ध्यानधारणा मेडिटेशन करा.

७) दिवसभराच्या महत्त्वाच्या कामांची यादी करून त्याप्रमाणे काम करा. ८) दररोज कमीतकमी अर्धा तास वाचन करा आणि चांगले व्हिडिओ पाहा.

९) झोपण्यापूर्वी उद्या करावयाच्या महत्त्वाच्या कामाची लिस्ट करा आणि त्याप्रमाणेच काम करा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!