जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१६७४ हेन्री ऑक्झेंडन याने महाराजांचे केलेले वर्णन, राज्याभिषक प्रसंगी हेन्री ऑक्झेंडनने महाराजांना नजराणा दिला होता. त्याचवेळी त्याने नजरेत टिपून ठेवलेले महाराजांचे वर्णन असे- “चेहरा सुंदर व पाणीदार, इतर मराठ्यांच्या मानाने वर्ण गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब, बाकदार व जरासे खाली आलेले, दाढी कापून हनुवटीचे खाली टोकदार केलेली, मिशी बारीक असून, मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा व जागरुकता हे गुण स्पष्ट दिसतात.”

कॉस्म द गार्द्र या पोतुर्गीज लेखकाने महाराजांचे केलेले वर्णन आहे. इ. स. १६९५ साली तो लिहितो, ‘With a clear and fair face nature had given him the greatest perfections specially the dark big eyes were so lively that they seemed to dart rays to fire. To these was added a quick, clear and acute intelli- gence.’ (महाराजांचा चेहरा मोहक होता. निसर्गाने त्यांना असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती. विशेषतः त्यांचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत आहेत.)

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!