जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : २. Human Skill: मानवी कौशल्य

जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : २. Human Skill: मानवी कौशल्य

 

२. Human Skill: मानवी कौशल्य

याला आपल्या माय मराठीत आपण म्हणू माणसं हाताळण्याचं कौशल्य किंवा कसब. प्रत्येक व्यवस्थापकाचा संबंध येतो तो सहकारी आणि हाताखालील माणसांशी आणि या माणसांना हाताळण्याचं कौशल्य म्हणजेच Human Skill. या कौशल्याची आवश्यकता कशासाठी तर हे Skill चांगलं अवगत असणारा माणूसच इतरांना नीट समजून घेऊ शकतो, त्यांचे प्रश्न नीट समजून त्यांना नीट दिशा दाखवू शकतो. त्यांना कार्य करायला प्रेरीत करु शकतो, संघ भावना निर्माण करु शकतो. या सर्वाचा परीणाम म्हणजे काय तर एक चांगलं काम घडवून आणण्यासाठी हे कौशल्य असणारा माणूस एक चांगली वातावरण निर्मीती करु शकतो. ज्यामुळे सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आपली मत, विचार मुक्तपणे मांडता येतील आणि एकोप्याच्या भावनेने एक संघ म्हणून सगळे लोक एकाच हेतूने एकाच दिशेने काम करुन कंपनी संस्था यशस्वी करु शकतात.

आता बारा गावची माणसे हाताळायची म्हणजे व्यवस्थापकही बारा गावचं पाणी पिलेला अनुभवी असणं आवश्यक आणि पुन्हा त्यासाठी जे कसब पणाला लागतं ते हेच की Human skill. आणि हे कसब आपण अंगी चांगल्या प्रकारे बानवायचे. कारण या जगातील एकही वनस्पती निरुपयोगी नाही. अगदी दगड माती देखील. तसे या जगातील एकही मनुष्य वाया जाण्यासारखा नसतो. गरज असते ती फक्त त्या माणसाकडून योग्य ते काम करवून घेणाऱ्या कुशल व्यवस्थापकाची. योजकसं तत्रं तत दुर्लभम् आणि हेच दुर्लभ काम सुलभ पद्धतीने तुम्हाला करायचे आहे.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!