जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ३. Technical Skill: तांत्रीक कौशल्य

जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ३. Technical Skill: तांत्रीक कौशल्य

 

३. Technical Skill: तांत्रीक कौशल्य

तांत्रीक कौशल्य म्हणेज जादूटोणा नव्हे. तांत्रीक कौशल्य म्हणजे जी यंत्रे

तुमच्या दैनंदीन कामकाजात वापरली जातात ती हाताळण्याचे कसब, मग तो संगणक असो की मोबाईल, विमान असो की जहाज. एखादी सांत्रीक चूक खूप महाग पडू शकते फक्त आर्थिकदृष्ट्या माही तर जीवीतहानी सुद्धा होऊ शकते. म्हणून है कसब चांगले अवगत असणं गरजेचं, तुम्ही एखादा टायपिस्ट पहा कसं काम करती ते. तो तुमच्याकडेच बघतो, तुमचे शब्द ऐकतो आणि दुसरीकडे त्याची बोटे बिनचूकपणे योग्य तीच अचूक अक्षरे टाईप करताना पाहिल्यावर तुम्हाला याच गमक नक्की कळेल. तुम्हाला तो टायपिस्ट एक जादूगर वाटल्याशिवाय राहणार नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या आजूबाजूला नीट निरखून पहा.

महाराजांच्या बाबतीत तर बघा. महाराजांच्या आयुष्यात १२५ लढाया त्यांनी शत्रूच्या गराड्यात शिरुन केलेल्या असताना अंगावर एकही जखम होऊ दिली नाही आणि समोर आलेला एकही शत्रू जीवंत माघारी जाऊ शकला नाही. हे हत्यार चालविण्याचं कसब म्हणजे तांत्रीक कौशल्यच होय. अपवाद फक्त एकदाच झाला आणि तो आकस्मीक, अपघाती म्हणावा असाच होय. तो म्हणजे प्रतापगडावर युद्धाच्या वेळी ज्याचे काम लढण्याचे नाही त्याने महाराजावर वार केला. यामुळे महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप असल्यामुळे महाराज वाचले. पण तांदळाएवढी जखम झालीच. महाराजाचं तांत्रीक कौशल्य चुकलं नव्हतं तर महाराजांच्या राजकीय शिष्टाचाराच्या नियमाचं उल्लंघन करुन अफजलखानाच्या वकीलाने कृष्णाजी भास्कर पंत कुलकर्णी यानं तो वार केला. अर्थात महाराजांनी लगेच पर्यायी यंत्रणा चालू केली आणि पुढच्याच क्षणाला समोरच्याला त्याच्या चुकीचा परिणाम त्याला दाखवून दिला. एकाच वारात कृष्णाजी भास्कराचे मुंडके उडवले गेले. विशाळ गडाच्या पायथ्याला तर महाराज सलग ७ तास दांडपट्टा चालवित होते अगदी अचूक म्हणून तर वेढा फोडून वर आले ना?

तांत्रीक कौशल्याचं जगप्रसिद्ध उदाहरण मराठ्यांनी जगाला दाखवून दिलं आणि ते म्हणजे गनिमी कावा. या गनिमी कावा नावाच्या जागतिक किर्तीच्या युद्ध प्रकारात घोडा वेगाने पळविणे, जाग्यावर थांबविणे, वळसा घेणे आणि काही सेकंदातच पुन्हा शेकडो किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडून वाऱ्याच्या वेगाने धावणं हे कसब म्हणजे घोड्यावर मावळ्याचं असलेलं नियंत्रण स्पष्ट करते. म्हणजेच काय तर मराठ्यांच्या विजयाचं रहस्य त्यांच्या तांत्रीक कौशल्यात म्हणजे वेगवान घोडदौडीत आहे हे स्पष्ट. तुम्हाला कायम जगाच्या पुढे रहायचे असेल, कायम पुढेच जायचे असेल तर या तांत्रीक कौशल्यावर चांगला भर देऊन नवीन असलेलं तंत्र लगेच आत्मसात करुन एक पाऊल सदैव जगाच्या पुढेच चालत राहा

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!