जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ४. Design Skill
४. Design Skill:
या कौशल्याला आपण Problem solving skill म्हणजे प्रश्न हातोटी असे म्हणतो. एका यशस्वी व्यवस्थापकाला फक्त प्रश्न समजून उपयोग नाही तर त्याला त्या प्रश्नाला अनुसरुन योग्य असे Design म्हणजे उत्तर तयार करता आलं पाहिजे. Best solution to worst problem हीच ती हातोटी आणि यासाठी व्यवस्थापकाकडे बुद्धीमत्ता, अनुभव असण्याची गरज असून ती सातत्याने अप-डेर सुधारीत करीत राहिले पाहिजे. जेणेकरुन त्यांना नवीन प्रश्नाची उत्तरे तयार करताना नवीन आणि अचूक अशी Design तयार करण्यात त्यांना यश येईल. जुन्या माहितीच्या आधारे नवीन प्रश्न सुटत नसतात तर नवीन प्रश्नाला नवीन पद्धतीचं उत्तर शोधणं अपेक्षित असतं. इथे Old wine in new bottle हे तत्व वापरता येत नाही. काही प्रश्नांना ताबडतोब उत्तरे अपेक्षित असतात तर काही प्रश्नांची दिर्घकालीन उत्तरे शोधावी लागतात. पण एक नक्की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं हे आपल्यासाठी आवश्यकच आहे. कोणताही प्रश्न अनुत्तरीत सोडला तर आपण जीवनाच्या स्पर्धेत पास कसे होणार ? म्हणून प्रत्येक प्रश्न सोडवा आधी सगळ्यात महत्वाचा नंतर कमी महत्वाचा आणि यासाठी प्रश्नांचा अग्रक्रम निश्चीत करा आणि निश्चीत उत्तर शोधाच. सोडविण्याची
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

