जिद्

जिद्

२०:८० चा फॉर्म्युला

गरिबी, श्रीमंती हा जगाचा अविभाज्य भाग आहे. जगात काय किंवा आपल्या देशात, राज्यात किंवा शहरात, गावात काय, श्रीमंत व गरीब लोक पूर्वीपासून होते व पुढेही असणारच आहेत. त्याचे प्रमाण २०:८० इतके असते. म्हणजे २० टक्के लोक श्रीमंत, तर ८० टक्के लोक गरीब असतात. याचे अधिक विश्लेषण करायचे, तर जे २० टक्के श्रीमंत असतात, त्यांच्याकडे एकूण ८० टक्के प्रॉपर्टी असते. तर उर्वरित ८० टक्क्यांकडे २० टक्के प्रॉपर्टी असते. आणि विशेष म्हणजे हे प्रमाण कायम असते. काही लोक आपल्या कमनि श्रीमंतीतून गरिबीत तर काही लोक गरिबीतून श्रीमंतांच्या वर्गवारीत येतात व जातात. ही एक निरंतर चालणारी गोष्ट आहे.माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचे, तर माझा जन्म गरीब असलेल्या ८० टक्क्यांमध्ये झाला. पण यशस्विता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच, बडी सोच, कड़ी मेहनत व पक्का इरादा या बळावर मी श्रीमंत अशा २० टक्क्यांमध्ये पोहचलो. काही जणांचा जन्मच श्रीमंत असलेल्या २० टक्क्यांमध्ये होतात. यामागे त्यांच्या आईवडिलांची पुण्याई असते.
मला स्वतःला अनुभवावरून असे वाटते की, श्रीमंत अशा २० टक्क्यांत येणे सोपे असते. पण दुर्दैवाने आपली मराठी माणसे २० टक्क्यांत आली, तरी फार काळ तिये राहत नाहीत. मराठी माणसांची श्रीमंती तीन पिववा टिकत नाही. असे का होते? गुजराती, मारवाडी, सिधी समाजातील मंडळी पिख्यानपिठ्या श्रीमंतीत राहतात. मग आपण मराठी मंडळीच का राहत नाही? आपणही कायम २० टक्क्यांत राहू शकतो, त्यासाठी आपली घुटण्यात यायला नको असते, अर्थात श्रीमंती आल्यावर माज आला नाही पाहिजे नसता ‘ये भी दिन जायेंगे,’ अशी परिस्थिती असते. असे म्हणतात की, बडप्पनकी कीमतभी चुकानी पड़ती है। ही किमत अदा करण्याची तयारी तन आणि मनानेही करावी लागते. ‘मी गरीब म्हणून जन्माला आलो, कारण ते माझ्या हाती नव्हते. पण मी गरीब म्हणून मरणार नाही, कारण ते माझ्या हाती आहे!’ असा दृढनिश्चय केला पाहिजे. त्यासाठी ध्येयनिश्चितीचा गोल सेट केला पाहिजे. यासाठी ५ प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत. हे ५ डी म्हणजे डेस्टिनेशन (ध्येय), डेडिकेशन (श्रद्धा, समर्पित भावना), डिटरमिनेशन (दृढनिश्चय), डिसिप्लीन (शिस्त) व हेडलाईन (समयसीमा).

२०:८० हा यशस्वितेचा फॉर्म्युला इटलीचा विल्फ्रेड परेरो या अर्थतज्ज्ञाने सर्वप्रथम मांडला. तो पुढीलप्रमाणे

  • २० टक्के श्रीमंत-८० टक्के गरीब,                                                                                                              * २० टक्के प्रयत्नांत ८० टक्के यश मिळते.
  • २० टक्के पिकात ८० टक्के धान्य मिळते,                                                                                                  * २० टक्के ग्राहक ८० टक्के माल खरेदी करतात.
  • २० टक्के डिलर ८० टक्के धंदा करतात,                                                                                                    *  २० टक्के ग्राहक ८० टक्के तक्रारी करतात.
  • २० टक्के लोक ८० टक्के पुस्तके वाचतात,                *                                                                               *  २० टक्के सवयी ८० टक्के चरित्र घडवितात.
  • २० टक्के गुन्हेगार ८० टक्के गुन्हे करतात,                                                                                                  *  २० टक्के ड्रायव्हर ८० टक्के अपघात करतात.
  • २० टक्के एजंट ८० टक्के धंदा करतात,                                                                                                      *  २० टक्के योग्य निर्णय ८० टक्के जीवन बदलतात.
  • २० टक्के कलाकारांना ८० टक्के चित्रपटांत काम मिळते.

जीवनात खरेखुरे यश मिळवायचे असेल, तर हा २०:८० टक्क्यांचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपला जन्म ८० टक्क्यांत झाला असला, तरी आपण २० टक्क्यांत येऊ शकतो.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!