जिद्

जिद्

जिद है आसमाँ को जहाँ बिजली गिराने की !

ख्वाईश है मेरी वहाँ आशियों बनाने की।

 

इतिहास फक्त त्याच व्यक्ती रचतात, ज्यांच्यामध्ये जिद्द असते. ही जिद्द म्हणजे नेमके काय असते? तर जिद्द म्हणजे बाउन्स बँक… न्यूटनचा नियम सांगतो की, For every Action there is Equal and Opposite Reaction. तुम्ही रबरी बॉल जर जमिनीवर जोरात आपटला, तर तो त्याच वेगाने पुन्हा वर उसळतो. यालाच Bounce Back म्हणतात. जिद्दीचेही तसेच असते. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला एखादा फार मोठा झटका बसला, अपयश आले आणि त्या व्यक्तीच्या मनात जिद्द पेटलेली असेल, तर तो पहिल्यापेक्षाही मोठे यश मिळवितो. असे यश की पाहणारेही अचंबित होतात, तोंडात बोटे घालतात. जिद्द असलेली माणसे अपयशाने कोलमडून पडत नाहीत, शेपूट खाली घालून निघूनही जात नाहीत; तर ते पुनरागमन करतात.. तेही झोकात.. जगाला दिशा देतात.

राजाराम भापकर गुरुजी… महाराष्ट्राचे माउंटनमॅन अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील या गुरुजीनी अशाच जिद्दीच्या जोरावर भीमपराक्रम केला. गुंडेगाव ते कोळगाव हा चाळीस किलोमीटरचा रस्ता, ज्यामध्ये सात डोंगर होते, तो त्यांनी तयार केला. वयाच्या विसाव्या वर्षी एकीकडे नोकरी व दुसरीकडे डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. हे काम त्यांनी तब्बल सत्तावत्र वर्षे अवितरपणे केले. कोणी तरी येईल, मदत करेल, शासन मदत करेल अशी वाट न पाहता त्यांनी स्वतः हातात टिकाव घेत कामाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी स्वतःचा पगार, पेन्शन सर्वकाही खर्ची घातले. त्यांना लोक वेडा गुरुजी म्हणायचे. तेही प्रत्युत्तर द्यायचे, “हो, मी वेडा आहे, पण ध्येयवेडा आहे.” जिद्द ठेवून त्यांनी हा रस्ता तयार केलाच. त्यांना ‘वेडा’ म्हणणारे लोकच आज या रस्त्याचा वापर करतात, भापकर गुरुजींचा गौरव करतात.

एकलव्याकडूनही जिद्द काय असते, हे शिकायला मिळते. भिल्ल समाजात जन्म झाल्यामुळे उच्चवर्णीय द्रोणाचार्यानी एकलव्याला धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिला. पण जिद्दी एकलव्याने द्रोणाचार्यांनाच गुरू मानले, त्यांचा मातीचा पुतळा तयार केला. त्यापासून प्रेरणा घेत श्रेष्ठ धनुर्धर झाला. अर्जुनापेक्षाही पारंगत झाला. पण द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याच्या हाताचा अंगठा कापून घेतला.

मेरी कोम ही मणिपूरसारख्या छोट्या, दुर्गम राज्यातील शेतकरी कुटुंबातील सामान्य मुलगी. तिथल्या परंपरेप्रमाणे वयात येताच तिचे लग्न लावण्यात आले. तिला तीन मुलेही झाली. यानंतर तिने बॉक्सिंग क्रीडाप्रकारात जागतिक दर्जाची कामगिरी केली. एका भारतीयाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचे पाहिल्यावर तिच्यातील जिद्द जागी झाली. तिने कसून सराव करीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक, दोन, नव्हे तर सहा सुवर्णपदके मिळविली. तिला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनकार्यही अशाच जिद्दीचे प्रतीक आहे. प्रखर राष्ट्रप्रेमातून त्यांनी बलाढ्य इंग्रजी साम्राज्याशी संघर्ष केला. अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. तेथील अकरा वर्षांच्या वास्तव्यानंतर त्यांनी बाउंस बँक करीत पुन्हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.
अटलबिहारी वाजपेयी भारताचे दिवंगत पंतप्रधान यांनीही बाउंस बैंक होणे म्हणजे काय असते, हे दाखवून दिले. १९८५ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अवघे दोन खासदार निवडून आले. तेथा जिद्दी बाजपेयी म्हणाले होते. “एक दिवस भारताच्या कानाकोप-यात कमळफुलल्याशिवाय राहणार नाही” मधल्या काळात १९९६ लाच वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले. लालकृष्ण अडवानी उपपंतप्रधान झाले. वाजपेयीचे देशात कमळ फुलविण्याचे स्वप्न आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून साकार झाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत मकिली करीत असताना गोऱ्या इंशजांनी रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढले. तिथेच त्यांच्यातील जिद जागृत झाली. गोऱ्यांनो, तुम्ही मला रेल्वेतून बाहेर काढले, मी तुम्हाल्य आमच्या भारत देशातून बाहेर घालवेना’ असा निर्धार करून त्यांनी स्वातंत्र्यलढा उभारला. मत्यत्य युसूफजाई पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरील पेशावरमध्ये जन्मलेली मालाला हीसुद्धा जिद्दीचे प्रतीक आहे. पाकिस्तानात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, तालिबानी राक्षसी प्रवृत्तीपासून मुक्तता मिळावी, यासाठी तिने वयाच्या बाराव्या वर्षी प्रयत्न सुरू केले. तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केल्य. तिच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी इगलेली मताला कोमात गेली. तिला लंडनला उपचारासाठी हलविण्यात आले. तिथे सहा महिने उपचारानंतर तिने आपले कार्य आणखी जोमाने सुरू केले. हार्वर्ड विद्यापीठात तिने दहशतवादाविरोधात आवाज उठविला, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही तिला बेट व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित करून तिचा सन्मान केला. खी-शिक्षणाचा जागतिक आवाज म्हणून मलालाला ओळखले जाते. तिला २०१४ मध्ये प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कारही मिळाला. हा मान मिळविणारी ती जगातील सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली. नोबेल पुरस्कार मिळाला, तेव्हा तिचे वय होते अवघे सतरा. याला म्हणतात जिद्द.

महामानव बाबा आमटे यांनी अशाच जिद्दीतून कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन फुलविले, स्वतः बाबा आमटे यांचा जन्म प्रतिष्ठित अशा श्रीमंत घराण्यात झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते महात्मा गांधींच्या संपर्कात आले. तेव्हापासून त्यांचा आचारविचार गांधीमय बनला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. पुढे १९५० मध्ये कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभे केले. त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमटे यांची पुढची पिढीही समाजकार्याचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवीत आहे.

भगतसिह, सुखदेव, राजगुरू हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील युवा देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी असेच जिद्दी बनले होते. हसत हसत ते फाशीच्या शिक्षेला सामोरे गेले. ‘सरफरोशी की तमत्रा अब हमारे दिलमे है, देखना है जोर कितना बाजूए कातील में है।’ असा महान मंत्र त्यांनी भारतीयांना दिला. जिए जितकी मोठी, तितके यशही मोठे मिळते. यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. जिद्दीच्या जोरावर तुम्ही स्वतःच स्वतःचे रस्ते बनवू शकता.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!