ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?

ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?

ध्येयाचे प्रकार

ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक वेळेत काय हवे किंवा मिळवायचे आहे? ते ‘काहीही’ असू शकतं. पैसा, घर, गाडी, लग्‍न हे तर सर्व मान्य विषयच आहेत; पण ध्येय गायक होण्याचं, मोठा खेळाडू होण्याचं, वजन कमी करण्याचं, समाजसेवेचं, रागावर नियंत्रण मिळवण्याचं कसलंही असू शकतं. प्रश्‍न हा आहे की तुम्ही नक्की ठरवलं आहे का तुम्हाला काय हवं आहे? किती हवं आहे? कसं हवं आहे? कधी हवं आहे? त्यासाठी अविरत प्रयत्न करायला तुम्ही तयार आहात ना? त्या यशासाठी किंमत तुम्ही मोजणार ना? तुमची अनेक प्रकारची ध्येय असू शकतात.

उदा . तुम्ही एकाच वेळेस व्यवसाय १० लाख करायचा व वजन दहा किलो कमी करायचं, अशी दोन ध्येय ठरवू शकता; पण मग त्यासाठी वेळ व इतर साधनांची वाटणी व नियोजन तसे करायला हवे व या दोन ध्येयांचाच पाठपुरावा करायला हवा. तुमच्या वेळेचा, विचाराचा व इतर साधनांचा खर्च काटेकोरपणे यासाठीच व्हायला हवा. या सर्व गोष्टी करताना आपले मनच आपला साथीदार व भागीदार असते. या सार्‍या विश्‍वात आपले मन ही एकच गोष्ट अशी आहे की, ज्यावर आपले नियंत्रण ‘असू शकते’. आपल्याबाबत घडणार्‍या घटनांवर आपले नियंत्रण नसते. आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचे. अशी प्रतिक्रिया देताना, आता तुम्ही विचार कराल की, ही गोष्ट, ज्यावर आपण वेळ, पैसा, विचार, भावना खर्च करत आहोत, ती ध्येयाशी संबंधित किंवा त्याजवळ नेणारी आहे का, तरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी, अन्यथा त्यावर मानसिक व शारीरिक शक्ती खर्च करू नये.

लेखक- अज्ञात (उद्योजक वक्ता)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!