ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?

ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?

ध्येय कसे ठरवावे?

ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक वेळेत काय हवे किंवा मिळवायचे आहे? हा प्रश्‍न परत विचारण्याइतका महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला नक्की काय हवे आहे? किती? कधी? ज्यांनी आयुष्यात यश मिळविले त्यांनी त्यांना आवडणार्‍या विषयात ध्येय ठेवले व त्यांतच काम केले, त्याचाच विचार केला. तुम्हाला गायक व्हायचे आहे, पण तुम्ही फुटबॉल सामने बघत राहिलात, तर काय उपयोग, तुम्हाला कोट्यधीश व्हायचे आहे, तर तुम्ही नोकरी केल्याने ते साध्य होईल का? तर, तुमच्या आवडत्या विषयातील ध्येय ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्यात काम करायला कंटाळा येणार नाही, तुम्ही दमणार नाही व कायम उत्साहात भरपूर मेहनत कराल.

त्याचप्रमाणे, तुमचे ध्येय SMART असू द्या.

S म्हणजे Specific ध्येय मोजक्या शब्दांत, आकड्यांत, तारखेत व्यक्त करा, ते लिहून काढा,

M म्हणजे Measurable असू द्या. नुसतं ‘भरपूर श्रीमंत व्हायचंय’, हे ध्येय नव्हे. ‘मला ३१ मार्च २०१६ पर्यंत १०० कोटी रुपये मिळवायचे आहेत’, हे ध्येय आहे. ध्येय मोजण्यासारखे ठरविल्यामुळे, त्यातील पायर्‍या, विभाग ठरविता येतात, मोजता येतात.

A म्हणजे Achievable . सुरुवातीला तुम्हाला दृष्टिपथात असेल असे ध्येय ठेवा, ज्यामुळे ते साध्य केल्यामुळे पुढे मोठी ध्येय ठेवण्याचा उत्साह वाढेल.

R म्हणजे Realistic . तुमच्या ध्येयातील टप्पे तुम्हाला ठरविता आले, तर तुमचे ध्येय realistic आहे.

T म्हणजे ढळाश Time Bound. तुमचे ध्येय तुम्हाला कोणत्या दिवसापर्यंत गाठायचे आहे, ते ठरवा. त्यामुळे ध्येय गाठण्यातील टप्पे तुम्हाला ठरविता येतील. उदा. तुम्हाला बारा महिन्यांत १०० कोटी मिळवायचे असतील तर प्रत्येक तिमाहीत २५ कोटींसाठी नियोजन करावं लागेल.

आपलं आठ ते दहा शब्दांचं ध्येयवाक्य ठरवा. ते कायम मनात रुजवा, त्याचा जप करा, ते लिहून ठेवा. त्याचे फलक करून तुमच्या घरात व कार्यालयात लावा. ते लोकांना सांगा, म्हणजे लोकही तुम्हाला विचारून त्याची आठवण करून देतील. तुम्ही ठरविलेले ध्येय तुम्ही गाठणारच यांवर तुमचा विश्‍वास हवा.

ध्येयवाक्याची काही उदाहरणे

३१ मार्च 2026 पर्यंत मला १०० कोटी रुपये मिळत आहेत.
माझ्या उत्पादनाची विक्री ३१ डिसेंबरपर्यंत १० लाख होत आहे.
३० ऑगस्टपर्यंत माझे वजन 68 किलो होत आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत मी इंग्लिश बोलायला शिकत आहे.

असं तुमचं ध्येयवाक्य तुम्ही आताच लिहून काढा व सुरू करा ध्येयाचा रोमांचकारी प्रवास आणि तुम्ही बघाल की, आयुष्यात कोणतीही गोष्ट करणं शक्य आहे. तुम्ही ठरविण्याचाच अवकाश!

लेखक- अज्ञात (उद्योजक वक्ता)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!