८. Establishing the sequence of Activities: कामाचा क्रम निश्चित करा.
Derivative plan कसा केला जातो ते
१. पन्हाळ्यातून बाहेर केव्हा पडायचे
२. आपण पुढे गेल्यावर पन्हाळ्याचे काय करायचे तो राखायचा की सोडून द्यायचा. राखायचा तर किती लोक गडरक्षणासाठी तैनात करायचे.
४. आपण मार्ग आणि वेळ ठरविली तेव्हा सोबत किती लोकांना घ्यायचे शिवा काशीदने भूमिका कशी वठवायची. ३०० मावळ्यांनी घोडखिंड कशी रोखून धरायची. किती वेळ पर्यंत शत्रूला अंगावर घ्यायचा.
५. सूर्य उगवल्यावर घोडखिंड ते विशाळगड हा २४ किलोमीटरचा प्रवास आणीबाणीचे
वेळ म्हणून कसा करायचा. चालत की पालखीत बसून.
६. विशाळ गडाला पोहचल्यावर शत्रूचा वेढा फोडून किल्ल्याची वाट कशी धरायची
७. किल्ल्यावरील फौजेला ताबडतोब कुमकेला येण्याची इशारत कशी द्यायची.
८. किल्ल्यावर गेल्यावर पावसाचे दिवस असूनही किती कमी वेळात तोफा डागून खिंडीतील सैनिकांना खिंड सोडण्याचा संदेशा पोहचवायचा.
असे हे आठ छोटे छोटे उप-प्लॅन महाराजांनी तयार करुन त्याचं व्यवस्थीत नियोजन अंमलबजावणी केली. पर्यायाने महाराज विशाळ गडावर पोहोचले. म्हणजेच काय तर ध्येय प्राप्त झालं. या आठ योजनेतील एक योजना जरी कमी पडली असतं तर निकाल आपल्याला माहीत आहे. महाराज संपले असते आणि स्वराज्यही अस्ताल गेले असते. पण तसे कसे होईल. अचूक नियोजन उत्कृष्ठ अंमलबजावणी करणाय महाराजांना हे चांगलेच जमायचे. आम्ही फक्त ऐकून सोडून देतो. वाचून विसरुन जातो. त्यामुळे आम्ही शिपाई म्हणून भरती झालो तर शिपाई म्हणूनच निवृत्त होतो किंवा जन्माच्या वेळी एक दुकान असेल तर पन्नास वर्षानंतर मरतानाही एकच दुकान असतं. नशीब नाहीतर तेही गमावून बसणारे महाभाग महाराष्ट्राच्या मातीत कसे जन्माला येतात कोण जाणे!
मोठी-मोठी काम करण्याच्या मानसिकतेच्या व्यक्तींनी अगोदर छोटी-छोटी कामे चांगल्या रितीने करायला शिकले पाहिजे. कारण जगातील सगळ्या मोठ्या माणसांनी छोटी-छोटी कामे उत्कृष्ठपणे करुनच जग जिंकले आहे. याचा अर्थ एवढाच की छोटी कामे चांगली करणारालाच मोठी कामे करण्याची संधी जग देते. छोटी कामेच करण्यात अपयश येणाराला जग कधीही मोठं काम देऊ शकत नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
