नियोजन करण्याचे टप्पे

९. Implementation: अंमलबजावणी

आता आपण सगळं नियोजन म्हणजे मुख्य योजना त्यातील छोट-छोट्या उप- योजना यांचा विचार केला त्यांचा क्रम आणि वेळ निश्चित केला. आता लोहा गरम झालेला आहे हातोडा मारण्याची वेळ आली. लोखंड गरम केलं आता हातोडा मारा. आपल्या नियोजनात सहभागी असणाऱ्या सर्वांना सूचना द्या आणि त्वरीत कामाला लागून अंमलबजावणी करायला सांगा. आता एवढी सगळी तयारी असल्यावर सहकाऱ्यांना कधी एकदाची तलवार उपसतो अशी प्रेरणा देणारे नियोजन आपण केलेले आहे. योजना चांगल्या प्रकारे अंमलात येण्यासाठी सहकाऱ्यांना व्यवस्थीत समजेन याची काळजी घ्या. कोई शक बिलकूल नही. असं त्यांच्याकडून वदवून घ्या. आता या अंमलबजावणीच्या कामालाच आपण कोणी करायचे, काय करायचे, केव्हा करायचे, कोठे करायचे आणि कसे करायचे या प्रश्नांची उत्तरे समजायचे म्हणजे प्रत्येकाला आपली भूमीका काय हे व्यवस्थीत कळले तर मग अडचण कशाची आपण जग जिंकणारच की!

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!