नियोजन करण्याचे टप्पे

१०. Review: पुनर्समीक्षा पुनर्मुल्यांकन

 

आता आपण योजना अंमलात आणायला सुरुवात केली तरी एक गोष्ट आपल्याला दुलक्षित करता येणार नाही आणि ती म्हणजे Review. याचे कारण असे की योजना बनविणे आणि अंमलबजावणी सुरु करणे यांत अंतर काळ असतो आणि तेवढ्या वेळात काही दिवस, तास, अगदी मिनीटांत काही बदल मग तो अंतर्गत असो वा बाहेरील परिस्थितीत घडून आला तर त्यानुसार आपणाला ताबडतोब योजनेत दुरुस्ती करावी लागते.

आणि समजा असा काही अचानक बदल झाला नाही तरी जी अंमलबजावणी आपण करीत आहोत त्याचं मुल्यमापन तर करावंच लागेल ना! म्हणजे मघाशी आपण जे म्हणत होतो कोणी केव्हा, कसं, काय, कोणतं काम करायचं ते आपण पाहिलं पाहिजे ना! की तसे होते आहे की नाही आणि कोठे काय कमी पडत असेल तर तेथे लगेच दुरुस्ती किंवा डागडुजी करावी लागेल. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीच शक्यता निर्माण झाली तर कदाचीत ताबडतोब योजना बदलून पर्यायी योजना मार्गी लावूनच का होईना पण ध्येय हे गाठलेच पाहिजे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!