नेतृत्वाच्या जगमान्य पद्धती

৭. Autocratic style : हुकूमशाही  पद्धती

जगात सर्वात पहिली नेतृत्वाची गरज जी उदयाला आली तीच ही हुकुमशाही पद्धत. ज्याच्या हाती लष्कर तो नेता किंवा राजा, आता हुकुमशहा होणं म्हणजे काय तर सगळे निर्णय आपण एकट्यानं घ्यायचं आणि ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत असा हुकूम सोडायचा. इथे नेता पूर्णपणे स्वतंत्र असतो. तो कोणताही निर्णय घेताना सहकाऱ्यांना विचारात घेत नाही आणि विचार करायला कोणाला संधीही देत नाही. अनुयायांच एकच काम आदेश पाळणं,

प्रश्न विचारायचे तेथे काम नाही. प्रश्न विचाराल तर एकतर बाहेर व्हावे लागेल किंवा ढगात जावे लागेल. या नेतृत्व प्रकारात अनुयायी कोणी नसतो तर सगळे गुलाम असतात. राजा बोले दळभार हाले. का कशासाठी हे प्रश्न अजिबात न विचारता नेत्याने दिलेला आदेश पाळणं एवढंच काम. नेता म्हणेल ती पूर्वदिशा आणि कार्यकर्त्यांना कायम दक्षिण दिशा (वाटोळे, मरण) आणि त्यांच्या वाट्याला कायम दैना.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!