नेतृत्वाच्या जगमान्य पद्धती

४. Participative style सहभागी पद्धत

नेतृत्व करण्यासाठी ही पद्धत अगोदर जी तीन नंबरची पद्धत पाहिली त्यापेक्षा प्रगत अशी आहे. या पद्धतीत सहकाऱ्याची फक्त मते विचार जाणून घेतले जात नाहीत तर त्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या कामातही सहयोग देण्याची संधी असते. म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आणि अंमलबजावणीच्या कामातही सहकारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण सहभाग असतो. एकत्र विचार आणि एकत्र काम हे या पद्धतीचे मोठे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच जो काही निकाल लागेल किंवा मोहिमेचे कामकाजाचे यश आणि अपयश असेल तेही संयुक्तपणे जबाबदारीने सर्व जण आपली जबाबदारी स्विकारुन काम करतात. इथे कर्मचारी आणि मालक, नेता आणि यापेक्षा एकमेकांच्या योग्यतेचा आदर करुन चांगले संबंध जोपासले जातात. महाराजांनी सुरत मोहीम राबवताना बर्हिजीचा सल्ला घेतला आणि मोहिमेत त्याला सहभागीही करुन घेतले. तिच गोष्ट जावळीच्या मोरेचा पाडाव करताना पहायला मिळते आणि तिच बाब महाराजांच्या दक्षिण दिग्विजयी मोहिमेच्या बाबतीतही पहायला मिळते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!