३८ =८+८+८ टाईम मॅनेजमेंट

३८ =८+८+८ टाईम मॅनेजमेंट

दुसरे ८ तास हे पुरुषार्थ पणाला लावून तुमच्या कामावर फोकस करून सर्वोत्तम काम करा. तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्या. आणि तिसरे ८ तास हे सर्वात महत्त्वाचे आहेत त्यामध्ये ३-F, ३-H आणि ३-S हा फॉर्म्युला समजून काम करा. ३ F मधील पहिला F म्हणजे फॅमिली कुटुंबासाठी वेळ द्या. दुसरा । म्हणजे फ्रेंड, मित्रासाठी वेळ द्या. आणि तिसरा F म्हणजे Faith तुमचा विश्वास, कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी, वाचनासाठी वेळ द्या. ३-H मधील पहिला H म्हणजे हेल्थ, व्यायाम आणि प्राणायाम. निरोगी शरीरासाठी वेळ द्या.

दुसरा H म्हणजे हायजिन, स्वच्छतेसाठी वेळ द्या. आणि तिसरा H म्हणजे हॉबी, आपल्या छंदासाठी वेळ द्या. आपला छंद जोपासा. शेवटच्या ३ S मधील पहिला S म्हणजे सोल, आत्मा परमात्मा, धार्मिकतेसाठी वेळ द्या, दुसरा S म्हणजे सर्व्हिस म्हणजे नोकरी नव्हे तर सेवाभाव, इतरांची सेवा करण्यासाठी वेळ द्या व शेवटचा S म्हणजे स्माईल, हसण्यासाठी, मनोरंजनासाठी सुद्धा वेळ द्या. अशाप्रकारे शेवटच्या आठ तासांचा उपयोग केल्यास तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी आणि आनंदी व्हाल. वेळेची किंमत काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर, एका वर्षाचे मोल नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याचे मोल समजायचे असेल तर अशा त्या मातेला विचारा जिने नऊ महिने नऊ दिवसा ऐवजी एक महिना अगोदर बाळाला जन्म दिला. एका दिवसाचे मोल तुम्ही, संचारबंदी, कर्फ्यू अन्य कारणामुळे रोजगार बुडालेल्या व उपाशीपोटी फक्त पाणी पिऊन पोटात पाय घालून झोपलेल्यांना विचारा. एका मिनिटाचे मोल, ज्यांचे विमान किंवा रेल्वे एका मिनिटामुळे हुकले त्यांना विचारा. एका सेकंदाचे मोल किती हे जाणून घ्यायचे असेल तर भयानक अपघातातून वाचलेल्यांना विचारा. आणि एका मिली सेकंदाचे मोल विचारायचे असेल तर ऑलिंपिक मधील पदक जिंकणाऱ्या किंवा हरणाऱ्या खेळाडूला विचारा. संत कबीर म्हणतात कल करे सो आज कर! आज करे सो अब ! पल मे प्रलय होगा, बहुरी करोगे कब ! उघडा डोळे बघा नीट. यापुढे इंडियन टाईम प्रमाणे काम न करता. प्राईम टाईम प्रमाणे काम करून जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!