५. Laissez-faire style
नेतृत्व करण्याची ही पद्धत जरा जगावेगळी परंतु आपण बऱ्याचदा पाहतो अशीच आहे. या पद्धतीत नेता आपल्या सहकाऱ्यांना जो काही प्रश्न अडचण, समस्या समोर आलेली आहे ती सांगून त्यांची मते विचारतो आता नेत्याने प्रश्न सोडवायची संधी अनुयायासमोर मांडल्यावर प्रत्येक कार्यकर्ता काही-ना-काही युक्ती प्रयुक्ती सांगून जातो. नेता सर्वाच्या त्या वेगवेगळ्या कल्पना, युक्त्या शांतपणे ऐकूण घेतो. सर्वाचे ऐकून घेतल्यावर त्यातील कोणकोणत्या गोष्टी पर्याय घेण्यालायक निवडण्यालायक आहेत ते पाहतो आणि त्यातील काही चांगल्या गोष्टी प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन पुन्हा त्या गोष्टींवर आणखी चर्चा घडवून आणून सहकाऱ्यांना तो पर्याय निवडण्याची सूचना करतो. इथे नेत्याचे काम फक्त अध्यक्षाप्रमाणे योग्य गोष्ट निवडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे. जे जास्त लोकांना पटते आणि त्याच वेळी नेत्यालाही योग्य वाटते अशी पर्यायी गोष्ट निवडून कामाला सुरुवात केली जाते. तुम्ही गावकीच्या सभा ऐका किंवा पंचायत महानगरपालिका आणि शासनाच्या बैठका पाहून घ्या. याच सदरात मोडतात. घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी अर्थात सामुहिक स्वरुपाचीच असते कारण तो निर्णय सगळ्यांशी सल्लामसलत करुनच घेतलेला असतो.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
