प्रेरणा म्हणजे काय ?
तुम्ही पैशाच्या बळावर लोकांची वेळ खरेदी करु शकता माणसाच्या शारिरिक अस्तीत्वाची हजेरी लावून घेऊ शकता पण तुम्ही त्यांचा पुढाकार घेण्याची वृत्ती खरेदी करु शकत नाही. तुम्ही त्यांची निष्ठा खरेदी करु शकत नाही. तुम्हाला ती कमवावीच लागते. थोडक्यात काय तर प्रेरणा नावाची गोष्ट जबरदस्तीने मारुन मुटकून तयार करता येत नसते तर ती निर्माण करावी लागते अर्थात ही प्रेरणा कशा-कशामुळे आणि कशाकशासाठी निर्माण करता येऊ शकते याची वेगवेगळी कारणे असतात. परंतु जोर- जबरदस्ती हे मात्र कारण असूच शकत नाही. लोकांना एखाद्या ध्येयाच्या दिशेने जागृत
१. प्रेरणा देणे हे नेत्याचं/व्यवस्थापकाचं कामचं आहे.
प्रेरणा देणे हा व्यवस्थापनाचा एक भागच आहे. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना अनुयायांना प्रेरणा ही दिलीच पाहिजे. कारण ते बॅटरीचं काम करतील. बॅटरी खतम तुमचं काम खतम. मोबाईलची बॅटरी चार्ज करणं हे जसं मोबाईल वापरणाराचं कर्तव्य आहे. तसंच नेत्याचं किंवा व्यवस्थापकाचं आहे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
