प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे

प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे

अवघड प्रवास सुरु करणे सोपे असते परंतु संपविणे खूप अवघड असते. हा तरुण जसजसा वर चढू लागला जमिनी पासून हजारो फुट उंचीवर खडकाळ- कातळातून वाट काढत असताना कुठेही त्याचा हात सुटला, पाय सटकला तर हजारो फुटांवरून कोसळणारा हा तरुण क्षणार्धात मृत्युमुखी पडणार होता. शीर तळहातावर घेऊन रायगड चढणारा हा हिंमतबाज तरुण आणि त्याची कसरत पाहण्यासाठी हजारो मंडळी रायगडपाशी जमली होती. गडाच्या कडेकपारीतील गरुडाचे, घारीचे हल्ले आणि अनेक विषारी साप, विंचू यांना समोरे जात अखेर हा धाडसी तरुण एका अवघड वाटेने रायगडावर चढता झाला.

महाराजांनी स्वतः पुढे जाऊन त्या धाडसी तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले.

एका अस्पृश्य समाजातील तरुणाला छातीला लावताना महाराजांकडे पाहून अनेक लोकांना वाईट वाटले. अरे पण महाराज अशी जातपात पाहून गळा भेट देणारे आणि भेदाभेद करणारे नव्हतेच. कसेल त्याची जमीन आणि पराक्रम करेल त्याचे कौतुक हा महाराजांचा ठरलेला नियमच होता. त्या दलित तरुणाला महाराज जे संभारंभपूर्वक बक्षिस देणार होते त्यापेक्षा या कौतुकाचे मोठे अप्नुप वाटले. महाराज लोकांना प्रेरणास्थानी तर होतेच परंतु स्वतः हा राजा जेव्हा एखाद्याला अलिंगन देतो तेव्हा त्या माणसाला ३३ कोटी देवांपेक्षा महाराज मोठे वाटले तर काही आश्चर्य नव्हते. महाराजांना लोक देवापेक्षाही जास्त मानत होते, आजही मानतात ते त्यांच्या देवाहूनही

श्रेष्ठ कामांमुळे, समता, न्याय बंधूता याचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं म्हणून. महाराजांनी सर्वात अगोदर त्या तरुणाच्या खाण्यापिण्याची आणि औषधपाण्याची
व्यवस्था केली. एखाद्या लढाईत जसा योद्धा शेकडो जखमा होऊन घायाळ होतो तसाच तरुण जागोजागच्या कातळ खडकातुन, कपारीतून, खळग्यातून वर येताना जागोजागी सोलटला होता. त्याचे हात आणि पाय रक्तबंबाळ झालेले होते. परंतु आता या त्याच्या सर्व कष्टाचे चीज होणार होते. महाराजांनी दुसऱ्या दिवशी रायगडावर दरबार भरवून सगळ्या मानकऱ्यासमोर त्या धाडसी तरुणाचा सत्कार केला. आणि भारावलेले महाराज बोलते झाले.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!