प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे
जोपर्यंत माझ्या स्वराज्यात असे बेलाग किल्ले चढून जाणारे लोक आहेत तोपर्यंत मला जगातला कोणताही किल्ला जिंकणे अजिबात अवघड नाही. रायगडसारखा बेलाग किल्ला चढून जाणारे धाडसी लोक जगातील कोणताही किल्ला माळा लावून सर करतील यात संशय नाही. माझा हा विश्वास सार्थ करणारा हा तरुण त्याची साक्ष आहे. महाराजांनी त्या तरुणाला स्वराज्याचा शिलेदार म्हणून नोकरीत घेतले आणि त्याला त्याचे बक्षिस दिले. १०० होन रोख एक सोन्याचे कडे आणि उमदा घोडा. आता हे छोटसं वाटणारं बक्षिस जे एवढ्या मोठ्या पराक्रमासाठी दिलं त्याची किंमत तुम्हाला माहित आहे का? सांगतो नीट लक्षात घेऊया. त्या काळात सोन्याचा भाव होता ५० पैसे तोळा. म्हणजे १ रुपयाला दोन तोळे सोने. मावळ्यांना दिले जाणारे बक्षिसाचे सोनेरी कडे असायचे बारा तोळ्याचे आज सोन्याचा भाव आहे २१००० रुपये तोळा. म्हणजेच आजच्या भाषेत त्या शंभर टक्के शुद्ध सोनेरी कड्याची किंमत झाली २५२००० रुपये. आणि शंभर होन म्हणजे किती रुपये ते पहा. एक होन म्हणजे त्या काळातील ४ रुपये आणि एका रुपयाचं सोनं खरेदी करता येई दोन तोळे म्हणजे १०० रुपयांत किती सोनं आलं तर ४०० तोळे आणि आजचा सोन्याचा भाव आहे २१००० म्हणजे रोख बक्षिस झालं ८४००,००० रुपये म्हणजे या मावळ्याला महाराजांनी दिलेलं बक्षिस हे काय किंमतीचं आहे ते पहा. दोन लाख बावन्न हजाराचे कडे चौऱ्याऐंशी लाख रोख रक्कम, उमदा घोडा आणि वरुन बोनस म्हणजे त्याला सरकारात महाराजांनी कायमस्वरुपी नोकरी दिली.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
