महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती
एकदा सकाळ झाली की मग लष्करी हालचाली गुप्त राहु शकत नाही आणि म्हणुन रात्रीच्या रात्री तो प्रवास सुरु करुन संपविणे खुपच आवश्यक होते. परंतु शिवाजी राजासारखा स्वाभिमानी राजा आपल्या अटी एवढ्या सहजपणे कशा कबुल करतो याचा सिद्धी जोहरला संशय आला आणि त्याचवेळी शिवाजी राजा पन्हाळयातुन सटकल्याची बातमी येवुन थडकली.
पडत्या पावसात चिखलयुक्त निसरड्या पायवाटा आणि ओढ्यांना पुर आलेला असतानाही सिद्धी जोहरच्या सैनिकांनी राजा शिवाजीला पकडण्यासाठी घोड्यावरुन पाठलाग सुरु केला. महाराजांकडे घोडे नव्हते आणि सिद्धीची फौज घोड्यावरुन पाठलाग करीत होती. त्यामुळे साहजिकच ते थोड्याच वेळात महाराजांना येऊन भिडणार हे नक्की होते. आणि मग महाराजांनी सिद्धीच्या फौजेला घोडखिंडीतच अडविण्याचा निश्चय केला.
वाट एकदम चिंचोळी व गनिमाला पार होण्यासाठी खुपच अवघड होती. अशाच ठिकाणी हाताशी असलेल्या फौजेनिशी सामना करण्याचे ठरले. परंतु महाराजांचे विशाळगडावर पोहोचणे खुप आवश्यक असल्याचे व लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मरता कामा नये अशी प्राणपुर्वक शपथ घालत बाजी प्रभु देशपांडे यांनी
महाराजांना पुढे जाण्यास सांगितले.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
