महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर जवळपास ४ महिने अडकुन पडले होते. गडावरुन मुंगीही खाली सरकु शकणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त सिद्धी जोहरने करुन ठेवलेला. ऐन पावसाळयाच्या हंगामात सुद्धा वेढा अजिबात ढिला पडत नव्हता. अशावेळी दुसरीच युक्ती करून पन्हाळयातुन बाहेर निसटणे अपरिहार्य होते. आणि म्हणुन छत्रपती शिवाजी
महाराजांनी सिद्धी जोहर बरोबर तहाची बोलणी सुरु केली, रेंगाळत ठेवली. अर्थात आज ना उद्या शिवाजी शरण येणार तह होणार या बातमीच्या हलचालीने आदिलशाही फौज हलु हळु बेसावध होऊ लागली. वेढा शिथिल होऊ लागला आणि अशाच प्राप्त प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा डाव टाकला.

शिवाजी राजा शरण येत आहे. तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी अमुक दिवशी येत आहे हे घोषित केले आणि शिवा काशिद नावाचा महाराजांचा अत्यंत विश्वासु माणुस महाराजांच्या भुमिकेत हुबेहुब महाराजांसारखा वागत सिद्धी जोहरच्या तंबुत दाखल होवुन वाटाघाटी करू लागला. तहाच्या अटी ठरवु लागला. तिकडे राजा शिवाजी आडवाटेने पन्हाळयाच्या वेढयातुन ६०० कडव्या मावळ्यांसह बाहेर पडुन केंव्हाच विशाळगडाच्या रोखाने चालु लागले होते. विशेष म्हणजे धावपळ आणि प्रसंगी एवढा आणीबाणीचा होता की महाराजांसह कोणाकडेही घोडा नव्हता. पन्हाळगड ते विशाळगड हे २० कोसाचे अंतर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्रीच्या अंधारात आणि भर पावसात चिखलाने भरलेल्या रस्त्याने प्रवास करीत सकाळपर्यंत तरी विशाळगडापर्यंत पोहोचणे आवश्यक होते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!