महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

शत्रुला हुलकावणी देऊन कात्रजचा घाट दाखविण्यात मराठे तरबेज होते. परंतु या प्रसंगी ती रणनिती कामाची नव्हती. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहचल्याचा इशारा मिळेपर्यंत खिंड सोडता येत नव्हती आणि त्यामुळे समोरासमोर घमासान केल्याशिवाय पर्याय नव्हता. घोडखिंडीत शेवटचा मावळा जिवंत असेपर्यंत गनिमाला एकही इंच पुढे सरकायला जागा मिळत नव्हती. मुडद्यांचा खच पडत चालला होता आणि
७ तासानंतर विशाळ गडावरुन इशारतीच्या पाच तोफा झडल्या. बाजी, फुलाजी, संभाजी, सिद्धी इब्राहिम व सिद्धी वाहवाह या सर्वांचे बलिदान कामी आले. महाराज गडावर पोहोचेपर्यंत गनिम खिंडीतच रोखला गेला. महाराजांनी विशाळ गडावरुन डागलेल्या पाच तोफा हा सांकेतिक इशाराच होता. लढाई करीत असताना माणुस डोळे आणि मन एकत्र करुन लढत असतो. आणि अशा वेळी विचलित न होता इशारा देण्यासाठी ज्या तोफांचा आवाज म्हणजे ध्वनीचा उपयोग महाराजांनी सिग्नल यंत्रणा म्हणुन केला.

घोडखिंडीचा प्रदेश दाट झाडी झुडपांचा आणि डोंगर दऱ्यांचा आणि विशाळ गडाचे अंतर बारा कोस. घोडखिंडीतुन विशाळगड किंवा विशाळगडावरुन घोडखिंड दृष्टिक्षेपात येणे अवघड. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकाशाचा उपयोग करता येणार नाही त्या ठिकाणी महाराजांनी ध्वनीचा उपयोग संदेश वहनासाठी करुन समयोचितपणा दाखविला.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!