महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी तयार केलेली सैन्य रचना आणि व्यवस्थापन, छत्रपतींच्या शिस्तबद्ध सैन्य रचनेमुळे मराठ्यांना बऱ्याच मोहिमांमध्ये हमखास यश मिळायचे. शत्रु सैन्याची फळी फोडत असतांना मराठी फौज विस्कळीत होणार नाही याची महाराजांनी नेहमी दक्षता घेतलेली असायची. त्यामुळे सैन्याला लढाईवर जातांनाच एक वेगळाच असा आत्मविश्वास असायचा.

प्रत्येकाला जेवढे काम दिलेले असायचे तेवढेच त्याने चोखपणे बजावले की यश हमखास असायचे. महाराज जेवढ्या कुशलतेने युद्धमोहिमांचे नियोजन करायचे तेवढ्याच कठोरतेने त्यांचे शिलेदार आणि मावळे त्याची अंमलबजावणीसुद्धा करायचे.

महाराजांची सैन्य व्यवस्था नक्की कशी होती याबाबत असलेली माहिती अशी की, स्वराज्याच्या फौजेचा साठ टक्के भार घोडदळावर तर चाळीस टक्के भार हा पायदळावर होता. महाराजांनी चतुरंग सैन्य व्यवस्था मोडीत काढून घोडदळ व पायदळ यावर जास्त भार ठेवला. घोडदळाने अनपेक्षित आणि विजेच्या वेगाने नवीन प्रदेशात मुसंडी मारून तो ताब्यात घ्यायचा आणि पायदळाने त्यांच्यावर अंमल प्रस्थापित करायचा. असा तो शिरस्ता असायचा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!