सुशिक्षित शिवाजी महाराज
१६७४ मध्ये हेन्री ऑक्झींडेन इंग्रजांतर्फे तह करण्यासाठी रायगडावर गेला होता. त्याच्या रोजनिशीत ११ जून १६७४ या तारखेची पुढील नोंद आहे. “naragy pandit sent word that the rajah had granted all our demands and articles excepting our money pass- ing current in his country which he accounted need less and had signed them.” (महाराजांना लिहिता येत नव्हते तर मग ते सही कशी करत होते. येथे हेन्री स्टॅम्प मारला असे म्हणत नाही सही केली असे म्हणतो.)
पुर्वी काही विशेष प्रसंगी कागदपत्र साक्ष इ. पुरावे नसल्यास विशेष प्रकारे खटला चालवून निवाडा करण्याची पद्धत होती. त्याला दिव्य करुन निवाडा करण्याची पद्धत असे म्हणतात. परतुं यासाठी सिंहासनावर बसलेल्या राजाची लेखी परवानगी घ्यावी लागत. अशा एका प्रकरणात शिवाजी महाराजांनी हातरोखा पाठविल्याचा उल्लेख आहे. हातरोखा म्हणजे राजाने स्वतःच्या हाताने लिहिलेले पत्र चिठ्ठी.
इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी खंड१ क्र. ४७३ सुरत येथील कौन्सीलच्या ८ मे १६७४ रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्तातील उल्लेख
“Several writings being sent by naransinay, sing by sevaji in order to concluding of the rajapore deffrences and confrimig a peace between the english and him, being
translated in to english and publicly read.”
फ्रेंचांना शिवाजी महाराजांचे एक आटोग्राफी लेटर आल्याची बातमी डचांना समजली होती. या आशयाचे शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २, पत्र क्र १३५१ प्रकाशीत आहे.
या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मतीत अर्थ एवढाच की महत्वाच्या गोष्टींची नोंद करण्यासाठी कायम सोबत डायरी बाळगा, महत्वाची कागदपत्रे स्वतः वाचून हस्ताक्षर करा. हाताखालील माणसं कायम बरोबर काम करतील याची अपेक्षा असली तरी खात्री करुन घेत चला.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
