महाराजांचे लष्कर व्यवस्थापन
या फौजेसोबतच शिलेदार मंडळी आपल्या ताकदीने मोहिमेवर असायची. परंतु त्याचेही नेतृत्व मात्र सरसेनापतीकडे असायचे. म्हणजे थेट सेनापतीच्या हाताखाली ही खास शिलेदार मंडळी असायची. त्यांना विशेष जोखमीची जबाबदारी दिली जायची आणि सैनापतींच्या निर्देशाची त्यांनी अंमलबजावणी करायची.
आता याच प्रमाणे पायदळाची रचना अशा प्रकारे असायची. नऊ शिपायांवर एक अधिकारी, त्याचा हुद्दा नाईक, पायदळाला शिवाजी महाराज पावलोक असे म्हणायचे. अशा दहा नायकावरील अधिकारी त्याचा हुडा हवालदार. अशा तीन हवालदारांवर एक अधिकारी त्याचा हुद्दा जुमलेदार. आणि अशा दहा जुमलेदारांवर एक अधिकारी तो हजारी मनसबदार. एक हजार सैनिकांचे नेतृत्व त्याच्याकडे असायचे. अशा सात एक हजारी मनसबदारांवर एक अधिकारी त्याला म्हणायचे सप्त हजारी मनसबदार, आणि सप्त हजारी मनसबदारावरील सर्वोच्च अधिकारी म्हणजे पायदळाचे सरनौबत किंवा सरसेनापती.
या सर्व सैन्य व्यवस्थे व्यतिरिक्त महाराजांचे स्वतःचे असे खास प्रशिक्षित आणि विश्वासू मावळ्यांची दोन हजार अंगरक्षकांचे एक दल असायचे. महाराज जिकडे मोहिमेवर जाणार त्या मार्गावर मागे-पुढे आणि छावणी टाकल्यावर छावणीचे संरक्षण अशी जबाबदारी या खास अंगरक्षकांची (ब्लॅक कॅट कमांडो, स्पेशल प्रोटेशन ग्रुप ए.इ.उ.) आणि एकटचा महाराजांच्या सर्वोच्च नेतृत्वाखाली चालणारे स्वतंत्र गुप्तहेर खाते.
बहिर्जी नाईक नावाचा गुप्तहेर या खात्याचा अत्यंत सक्षम असा अधिकारी आपणां सर्वांच्या परिचयाचा आहेच. परंतु त्या व्यतिरिक्त रावजी, सुंदरजी, कर्माजी, विश्वास मोसेखोरे, विश्वासराव दीघे असे पाच गुप्तहेर खात्याचे प्रमुख अधिकारी आणि त्यांचे नेतृत्व बहिर्जीकडे. महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या एवढ्याच लोकांची नावे माहित परंतु त्यांच्या बद्दलची विस्तृत माहिती अजुनही जगाला मिळत नाही. हेथ महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश म्हणावे लागेल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
