महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मराठा साम्राज्याचे 12 किल्ले समाविष्ट करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांचा समावेश आहे.
तसेच, तामिळनाडूतील जिंजी किल्ला देखील या यादीत आहे,
या 12 किल्ल्यांमध्ये मराठा साम्राज्याच्या लष्करी स्थापत्यशास्त्राचा आणि संरक्षणात्मक प्रणालीचा उत्कृष्ट नमुना दिसतो.
युनेस्को यादीत समाविष्ट मराठा साम्राज्याचे 12 किल्ले:
१.”साल्हेर किल्ला: नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला.*
२.शिवनेरी किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.
३.लोहगड किल्ला: पुणे जिल्ह्यातील एक मजबूत किल्ला.
४.खांदेरी किल्ला: मुंबईजवळचा किल्ला.
५.रायगड किल्ला: मराठा साम्राज्याची राजधानी.
६.राजगड किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला किल्ला.
७.प्रतापगड किल्ला: अफजलखान वधासाठी प्रसिद्ध.
८.सुवर्णदुर्ग किल्ला: समुद्राजवळचा किल्ला.
९.पन्हाळा किल्ला: कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा किल्ला.
१०.सिंधुदुर्ग किल्ला: समुद्रात बांधलेला किल्ला.
११.विजयदुर्ग किल्ला: मराठा आरमाराचे महत्त्वाचे केंद्र.
१२.जिंजी किल्ला: तामिळनाडू राज्यातील किल्ला.
या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासाला आणि स्थापत्यकलेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे,
या आनंददायी बातमीचे वृत्त मिळताच महाराष्ट्रभर आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम
लेखक- अज्ञात
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
