यशस्वितेचा कायदा
मिळविण्यापेक्षा देण्याची सवय जास्त लावा. स्वकर्तृत्वावर विश्वास असेल, तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता व आयुष्याचे गणित सोडवू शकता.
असे महणतात की, Knowledge and Innovation are the power of future ज्ञान व प्रयोगशीलता हो भविष्यतील ताकद असते. विविध माध्यमांतून चांगले ज्ञान मिळवून त्याचा व्यवहारात उपयोग करण्याची कला एकदा आत्मसात झाली की, तुम्ही नक्की यशस्वी होता, हा माझा स्वानुभव आहे. मी आयुष्यात रोकाडो पुस्तके वाचलीत. जवळपास पाच लाख रुपयांची पुस्तके मी संपर्कात आलेल्या अनेक युवक-युवतींना भेट दिली आहेत. जवळपास शे-दीडशे यशस्वी लोकांची जीवनचरित्रे मी वाचली आहेत. वाचून सोडून नाही दिली, तर त्यातील जास्तीतजास्त चांगल्या गोष्टी स्वतः आचरणात आणण्याचा कायम प्रयत्न केला आहे. माझी ही ज्ञानलालसा आजही कायम आहे. यातील सर्व पुस्तकांनी मला सखोल ज्ञान दिले. त्यातही ‘लॉ ऑफ सक्सेस’ या नेपोलियन हिल यांच्या पुस्तकाने मला माझ्या व्यवसायात भरघोस यश मिळवून दिले, हे सांगताना मला आनंद होतो.
कोण होता नेपोलियन हिल?
नेपोलियन हिल हा अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला व अभ्यासात अतिशय सामान्य असलेला मुलगा… त्याच्यावर अँड्रयू कारनेजी, हेन्री फोर्ड, डेल कारनेजी यांच्या विचारांचा खूप पगडा होता. ते सर्व त्याचे द्रोणाचार्य होते. त्यांचा सहवास आपल्याला मिळावा, त्यांच्याकडून काही तरी शिकायला मिळावे, अशी त्याला आस होती. एकदा तो अँड्रयू कारनेजीला भेटण्यासाठी त्याच्या फॅक्टरीत गेला. आता नेपोलियनसारख्या पोरसवदा व्यक्तीला एवढ्या मोठ्या माणसाबरोबर लगेच भेट थोडीच मिळणार? त्याला गेटवरच अडविण्यात आले. पण नेपोलियनची इच्छाशक्ती दांडगी होती. तो गेटपासून थोडे लांब पण अँड्डू येण्याच्या मार्गावर उभा राहिला. अॅण्डूची गाडी आली व त्याने लगेच त्याला सलाम ठोकला. अॅड्यू आपला आपल्याच कामात मग्न. त्याने काही नेपोलियनला पाहिले नाही की त्याचा सलामही पाहिला नाही. पहिल्या दिवशी अपयश आले. पण त्या नंतर सलग २१ दिवस नेपोलियन त्याच जागी येऊन उभा राहायचा व अॅड्यूची गाडी आली की, सलाम करायचा. योगायोगाने एकविसाव्या दिवशी कारनेजीच्या लक्षात आले की, एक मुलगा आपल्याला रोज ठरावीक वेळी सलाम करतोय. त्याने गाडी थांबवून नेपोलियनला बोलावून घेतले व विचारपूस केली. त्याला काही पैसे देऊ केले. पण नेपोलियनने पैसे घेण्यास नकार दिला व म्हणाला, “मला तुमचा दहा मिनिटांचा वेळ हवा आहे.” कारनेजीला या मुलामध्ये काही तरी वेगळे पाणी आहे, हे कळले. त्याने त्याला वेळ दिला. त्या भेटीत नेपोलियनने विनंती केली, “तुम्ही खूप गरिबीतून खूप श्रीमंत व यशस्वी झाला आहात, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे, ते तुम्ही मला सांगा.” त्यावर कारनेजी म्हणाला, “यशासाठी तुला तुझ्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावं लागेल. तुला कशाची आवड आहे?” नेपोलियन म्हणाला, “मला वाचायला व लिहायला आवडते.” मग कारनेगीने त्याला सल्ला दिला, “मी माझी यशोगाथा तर सांगतोच, पण तू अशाच
आणखी काही यशस्वी लोकांशी संवाद साधून त्यांचं अवत्लेकन कर मशस्वितेवर एक पुस्तक लिही.” तो सल्ला प्राणातून नेपोलियने जवळपास ५०० लोकांशी संवाद साधला, त्यांची यशोगाचा समजून घेतली व पुस्तक लिहिले त्याचे नाव ‘त्थे ऑफ सक्सेस’ हे पुस्तक १९२८ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर त्याने १९३७ र आणखी एक पुस्तक लिहिले, ‘शिक अॅड यो रिच. आतापर्यंत या पुस्तकांच्या तीन त्यांहून अधिक प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत. अनेक भाषांत त्याचे अनुवाद झाले आहेत. भी स्वतः १९८४ ला नेपोलियन हिलचे ‘लॉ ऑफ सक्सेस’ हे पुस्तक विकत घेऊन वाचले. या पुस्तकांपोटी नेपोलियनला जवळपास २१० कोटी रुपये मिळालेत. अजूनही त्याच्या पुढच्या पिक्यांना रॉयल्टी मिळतेच आहे. यात्थ म्हणतात, ‘एक ही सादे सब सादे.’ आवडीच्या क्षेत्रात काम करीत टॉपर झाल्यास काय होते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
