यशाचे गुपित

यशाचे गुपित

तेरा वर्षे वयाचा उद्योजक: तिलक मेहता

उद्योजक किवा व्यावसायिक होण्यासाठी वयाची बंधने कधीच नसतात. फक्त दृढनिश्चय, तीव्र इच्छाशक्ती व प्रत्यक्ष कृती गरजेची असते. गुजराती समाजातील मुंबईचा तेरा वर्षांचा तिलक मेहता हा भारतातील सर्वात लहान वयाचा उद्योजक म्हणून नावाजला जातो. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तिलक मेहताला एकदा दोन पुस्तके अभ्यासासाठी तातडीने हवी होती. पण त्याला मुंबईतल्या मुंबईत त्याच दिवशी कुरियर पोहोचते करणारी कोणतीच कुरियर सेवा मिळाली नाही. ही गोष्ट त्याच्या मूळच्याच व्यापारी प्रवृत्तीच्या मनाला कुठे तरी खटकली.
यात त्याला संधी दिसली. त्याने लॉजिस्टिक कंपनीत मॅनेजर असलेल्या महिलांशी तसेच बँकेत मैनेजर असलेल्या काकांशी (चुतते) चर्चा केली. सहा महिने विचारमंचन केले व जुलै २०१८ मध्ये ‘पेपा एन पार्सल’ ही कंपनी सुरू केली. त्याने पार्मल लवकरात लवकर संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी मुंबईच्या जगप्रसिद्ध डबेवाल्यांशी टायअप केले. त्याचे काका पुतण्याच्या कंपनीत सीईओ महणून रुजू झाले. ‘सेम डे पिकअप अँड सेम हे डिलिव्हरी’ या तत्वावर कंपनीने काम सुरू केले. पहिल्या सहा महिन्यांतच कंपनीने एक लाख तीस हजार पार्सल पोहचते केले. यासाठी त्यांनी एक मोबाईल अॅप डेव्हलप केला, त्यावर पार्सलचे रिअल टाईम ट्रैकिंग ग्राहकांना दिसते. यातून विश्वास वाढत गेला. सेवा अधिकाधिक अचूक झाली. मुंबईचे त्रेसष्ट भाग पाहून त्याने माणसे नियुक्त केली. सुरुवातीला दोनशे पार्सल दररोज पोहचते करणारी ही कंपनी आता दिवसाला १२०० ते १५०० पार्सल पोहचते करते. तिलकच्या कंपनीत आता शंभर माणसे काम करतात. या शिवाय तीनशे डबेवाले कमिशन बेसिसवर काम करतात. चालू वर्षी तिलकने कंपनीची उलाढाल शंभर कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फक्त वीस रुपये प्रति पार्सल शुल्क घेऊन ही कंपनी पार्सल कुरियर सेवा, तीही सेम डे देते. याशिवाय तो प्रत्येक पार्सलचा इन्शुरन्सही कावतो. त्यामुळे नुकसानभरपाई द्यायची वेळ आल्यास त्याच्या कंपनीवर मोठा बोजा पडत नाही. हॉस्पिटलचे लॅब रिपोर्ट, विविध कार्यालये, दुकानांची बिले, चेक इत्यादीची कुरियर पार्सल सेवा कंपनी देते. त्याला या यशाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रेटीनी तिलक मेहताच्या व्यावसायिक कल्पकतेचे कौतुक केले.

तिलक मेहता आजही नियमितपणे शाळेत जातो. दुपारी तीनपर्यंत शाळा शिकल्यानंतर तो ४.३० ते ७.३० या वेळेत कार्यालयात येऊन कामकाज पाहतो. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी तो पूर्णवेळ कार्यालयात असतो. हा व्यवसाय सुरू करण्याआधी त्याने स्वतः फिल्डवर उतरून अभ्यास केला. पंधरा दिवस तो डबेवाल्यांबरोबरच मुंबईभर फिरला. अनुभव घेतला, अडचणी लक्षात घेऊन त्यावर उत्तरे शोधली. बेस्ट बिझनेस मॉडेल तयार केले. त्यामुळेच तो अगदी कमी वयात यशस्वी उद्योजक बनला आहे. भविष्यात कंपनीचे आय. पी. ओ. काढून देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी कुरियर कंपनी बनविण्याचे स्वप्न त्याने पाहिले आहे.

तेरा वर्षांचा तिलक मेहता असा पराक्रम करीत असताना आपली मराठी मुले काय करतात, याचाही विचार केला पाहिजे. आपल्याकडे मुलगा पंचवीस-तीस वर्षांचा झाला, तरी आईवडिलांवर अवलंबून असतो. त्याचे पालनपोषण आईवडीलच करत असतात. स्वतःच्या हिमतीवर तो स्वतःचे पोट भरण्यापुरतेही कमवत नाही. अशा सर्वांसाठी तिलक मेहताची सत्यकथा डोळ्यात अंजन घालणारी आहे. शाळेत शिकणारा हा तिलक मेहता आज एम. बी. ए. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लेक्चर द्यायला जातो. त्याच्या कंपनीचे अॅप डाऊनलोड करणाऱ्या ग्राहकांना शंभर टक्के कॅशबॅकची ऑफर देत त्याने मुंबईतील जवळपास वीस टक्के कुरियर बिझनेस आपल्या कंपनीकडे खेचून आणला आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!