यशाचे गुपित

यशाचे गुपित

बजेट कसे असावे?

बजेटसंदर्भात सर्वसाधारण व्यक्ती कायम बोलत असते. काहीही मागितले की, लगेच उत्तर तयार, ‘बजेट नाही, राव.’ मुळात यांना बजेट म्हणजे काय, हेच कळलेले नसते. त्यांना वाटते की, आपलं जेवढं उत्पन्न आहे त्यानुसारच चौकटीत खर्चाचा ताळमेळ बसवायचा.. झाले बजेट.

पण खरे बजेट असे नसते. आपल्या देशाचे किवा राज्याचे अर्थमंत्री बजेट मांडतात, तेव्हा ते पुढील वर्षभरात कोणत्या गोष्टीसाठी कोणता खर्च करायचा, हे आधी मांडतात. त्यानंतर ते या खर्चासाठी पैशाची तरतूद कशी करायची, याची जमा बाजू मांडतात. खर्चाप्रमाणे उत्पन्न मिळविण्यासाठी ते विविध मार्ग शोधून काढतात. कधी करवाढ करतात, कधी नवीन कर लागू करतात. चैनीच्या गोष्टीवरील कर नेहमी वाढविला जातो. दारूवरही कर सातत्याने वाढविला जातो. इन्कमटॅक्स, जीएसटी, सेवाकर अशा विविध मार्गांनी उत्पन्न वाढविले जाते. अशा बजेट थेअरीमुळेच विकास होतो. आधी जमा बाजू पाहून त्यानुसार काम करायचे ठरविले तर विकासाची गती वाढूच शकणार नाही. यासाठी आपणही आपल्या जीवनात उत्पन्नाचे मार्ग शोधून विकास साधला पाहिजे व सरकारी बजेटप्रमाणे आपले बजेट मांडले पाहिजे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!