यशाचे गुपित

यशाचे गुपित

मी समाधानी आहे

‘घरात नाही खायला दाणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी एक म्हण सर्वांच्या परिचयाची आहे. मराठी माणसे ही अशा खोट्या प्रतिष्ठेत अडकलेली असतात. उसने अवसान आणण्यात पटाईत असतात. ‘मला गरज नाही, मी आहे त्यात समाधानी आहे, मला पैशाची हाव नाही’ अशी निरर्थक वाक्ये ती बोलत असतात यशस्वी लोकांच्या तोडी असली वाक्ये कधीच येत नाहीत. शेकडो कमावले, तर ते हजारो कमाविण्याचे ध्येय ठेवतात, हकरो कमावत्यावर लाखोंचे उद्दिष्ट ठेवतात. त्यांना यशाची भूक असते. त्यामुळेच ते दिवसेंदिवस प्रगतीच करतात. यशतवावत ते कायम असमाधानी असतात, आणखी मोठे यश त्यांना खुणावत असते.

या उलट सर्वसाधारण लोक पैशाचा, धनाचा तिरस्कार करतात. ‘पैसा जास्त झाल्यावर माणूस शेफारतो, जास्त पैशाची हाव बरी नाही, असे ते म्हणत असतात. ‘पैसा पैसा काय करायचा, पैशाला तर कोंबडपाही खात नाहीत. आम्हीच कोवहया खातो।’ अशी वाक्ये त्यांच्या तोंडी असतात. काही फुगीर लोक तर म्हणतात, ‘पैसा कमवणे काय अवघड आहे? मी लाथ मारेन, तिथे पाणी काडू शकतो. पण मी समाधानी आहे, म्हणून मी त्या भानगडीत पडत नाही.’

मला वाटते, अशा फुगीर लोकांना आमच्या मराठवाडयात न्यावे, तिथल्या ओसाड जमिनीला लाथ मारा व पाणी काळा’ असे त्यांना सांगावे. त्यांच्या त्या ताकदीचा उपयोग आमच्या दुष्काळी भागाला तरी होईल. पण नाही, असे करायचे म्हटल्यावर ते पळून जातील. मला वाटते, असे फुगीर लोक हे स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची, समाजाची फसवणूक करीत असतात. अशा लोकांना विचारले पाहिजे, “तुमच्या मुलाने शिक्षणासाठी चांगाला संगणक मागितला किवा बायकोने सोन्याचे नवीन दागिने मागितले, आईवडिलांनी उतारवयात विमानाने देवदर्शन, दानधर्मासाठी पैसे मागितले, तर तुम्ही देऊ शकता का?” त्या वेळी गरीब गाय बनून ते उत्तर देतील, “आपलं बजेट नाही तेवढं.”

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!