यशाचे गुपित

यशाचे गुपित

गरीच कधी आनंदी नसतो, पण आनंदी भाणूस हा कधीही गरीब असू शकत नाही. कौटुंबिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक बशाला ‘सर्वोत्कृए यश’ किंवा ‘मेगा सक्सेस’ म्हणतात.माणसात्प कळायला लागते, तेव्हापासून तो एक शब्द कायम ऐकत असतो, ‘यश’ शाळेत, कॉलेजात, नोकरीत, व्यवसायात सगळीकडेच सगळ्यांचा एकच नारा असतो, यश मिळवायचे. या यशाचेच गुपित आपण या प्रकरणात समजून घेणार आहोत. असे म्हणतात, Poor person cannot be happy person. But happy person is not a poor person. खूप मोठा अर्थ दडलेला आहे या वाक्यात. यशाच्या व्याख्येतही असाच अर्थ दडलेला आहे. त्यातही यशामध्ये खूप मोठे यशही असते. त्याला Mega Success असेही म्हणता येईल.

Mega Success म्हणजे मोठे यश कशाला म्हणायचे?

मोठ्या यशात साधारणतः ५ भाग असतात. Physical (शारीरिक), Financial (आर्थिक), Mental (मानसिक), Social (सामाजिक), Spiritiual (आध्यात्मिक), या पाचही भागांत यश मिळाले, तर ते असते Mega Success असे मोठे यश कोणाला मिळाले आहे? नक्की अनेकांना मिळाले आहे. समाजकारणात राष्ट्रपिता महात्मा गांधी, अण्णा हजारे, मदर तेरेसा, बाबा आमटे, राजकारणात इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, अर्थकारणात धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला, अजिज प्रेमजी, नारायण मूर्ती. क्रीडाक्षेत्रात सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, विश्वनाथन आनंद, विराट कोहली. फिल्मी दुनियेत अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, धर्मेंद्र, हेमामालिनी अशी अनेक नावे घेता येतील.

ही सर्व मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात इतकी यशस्वी का झाली? त्याचीही काही कारणे आहेत: १. त्यांचे ध्येये मोठे व पक्के होते, २. त्यांची ताकद कशात आहे, जन्मजात गुण कोणते आहेत हे त्यांना फार लवकर कळले होते, ३. अफाट कष्टाची व मेहनतीची तयारी होती, ४. त्यांचा स्वतःच्या कार्याकडे, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन १०१ टक्के सकारात्मक होता. ५. कामाची लाज वाटत नव्हती, ६. लोक काय म्हणतील याकडे ते दुर्लक्ष करायचे.

यावरून हे सिद्ध होते की, जर तुम्हाला मेगा सक्सेस मिळवायचे असेल, तर काही तत्त्वे, नीतिमूल्ये तुम्हाला जपावीच लागतील, पाळावीच लागतील. ही तत्त्वे पुढीलप्रमाणे-

Aim beyond Aim – ध्येयाच्या पलीकडेही ध्येय आहे, तेच मेगा सक्सेस आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!