योग्य निर्णय घेण्याची प्रक्रिया

 

   जागतिक दर्जाचे निर्णय कसे घ्यावे। Process of decision making: निर्णय घेण्याची प्रक्रिया

 

१. Define the problem: प्रश्न काय ते समजून घ्या.

“निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील पहिला प्रश्न किंवा टप्पा म्हणजे मूळातच प्रश्न काय आहे ते समजून घ्या. प्रश्न अनेक असतात त्यामुळे कोणता प्रश्न कार्याच काय अवस्थीत समजून घ्या. नाहीतर रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असे जे आपले जुने लोक म्हणतात ते यासाठीच की प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न नीट समजून न घेता उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर हातात कळसा आणि गावाला वळसा मजा होऊ शकते.

त्यामुळे हुशार माणसाने प्रश्न नीट अभ्यासावा. तो समजून घ्यावा आणि त्यानंतर त्या प्रश्नाची कारणे शोधावीत आणि त्या प्रश्नाचे परीणाम काय असतील याचाही अभ्यास करावा. म्हणजे कळूनही निर्णय नाही घेतला तर काय होऊ शकते या गोष्टी लक्षात घेऊन प्रश्न सोडविला गेला पाहिजे.

नाहीतर आपण एक प्रश्न सोडविण्याच्या भानगडीत नवीन अनेक प्रश्नांना जन्माला घालायचो. असे म्हणतात की जर आपण उत्तराचा भाग नसू तर प्रश्नाचा भाग नक्कीच असतो. If we are not a part of solution then surely a part of problem.

आणि आपल्याला तर problem सोडवायचे आणि Solution मिळवायचे आहेत.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!